Agricultural Drone: गोव्यात शेतीसाठी वापरले जाणार ‘कृषी ड्रोन’! योजनेतून 10 ड्रोन मिळणार; CM सावंताची घोषणा

Goa Agricultural Drone: गोव्‍यातील शेतकामात आता नवीन तंत्रज्ञान वापरण्‍यात येणार असून यावेळी शेतीसाठी ड्रोनचा वापर केला जाणार असल्‍याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
Agricultural drones in Goa
Goa farming technology drone agricultureDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्‍यातील शेतकामात आता नवीन तंत्रज्ञान वापरण्‍यात येणार असून यावेळी शेतीसाठी ड्रोनचा वापर केला जाणार असल्‍याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राय येथील डॉन बॉस्को महाविद्यालयात खरीप हंगामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना ‘नमो ड्रोन दीदी’ योजनेंतर्गत राज्याला सुमारे दहा ड्रोन मिळतील, अशी घोषणा त्‍यांनी केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी राय येथील खरीप हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना, सरकार गोव्‍यातील शेतीला चालना देत असून १ लाख हेक्‍टरपेक्षा अधिक जमिनीत पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शेतकरी बचत गटांना सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाईल, असे सांगितले.

गेल्या दहा वर्षांपासून, कृषी संचालनालय गोव्यातील शेतकऱ्यांना मदत करत आहे. आता यांत्रिक पद्धतीने ४०० हेक्टर शेतीत लागवड केली गेली आहे, नजीकच्या भविष्यात यांत्रिक पद्धतीने सुमारे ४००० हेक्टर जमिनीत लागवड केली जाईल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Agricultural drones in Goa
Goa Agriculture: सत्तरीचं हरवलेलं वैभव परतलं! शिर-सावर्डेत पुन्‍हा बहरली 'पुरण शेती', कृष्‍णा सावंत यांच्या प्रयत्नांना यश

कृषी मंत्री रवी नाईक यांनी सांगितले की, राज्यातील तरुण कृषी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. आणि रोजगार शोधत आहेत हे पाहून खूप आनंद होतो. कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले की, गोवा कृषी विभाग शेतकऱ्यांना विविध अनुदान देत असून, आतापर्यंत भात लागवडीच्या योजनांवर ८० कोटी रुपये खर्च केले आहेत. कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

Agricultural drones in Goa
Agri Bazar at Ponda: ‘ॲग्री बझार’ मधील थिएटर करार नक्की किती वर्षांचा? पार्किंगच्या जागेचा वापर थिएटरसाठी?

साखळीत कृषी क्लिनिक अभ्यासक्रम

साखळी येथे ‘कृषी क्लिनिक’ अभ्यासक्रम सुरू करणार आहे. हा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम असेल आणि जुलै २०२५ पर्यंत तरुण त्यात प्रवेश घेऊ शकतात. यामुळे जमिनीच्या सुपीकतेचे विश्लेषण करण्यास आणि पिकांच्या रोगांवर अभ्यास करण्यास मदत होईल.. १ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत करण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com