Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: 'एलएसडी' प्रकरणातील फरार संशयिताला बंगळुरूत अटक, चार दिवसांची सुनावली पोलिस कोठडी

Drug Case: अमलीपदार्थ विरोधी पथकाने एका मोठ्या कारवाईत, सुमारे ११ कोटी रुपये किमतीच्या एलएसडी ड्रग्ज प्रकरणात फरार असलेल्या संशयित विनीश वाय. के. याला अटक केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अमलीपदार्थ विरोधी पथकाने एका मोठ्या कारवाईत, सुमारे ११ कोटी रुपये किमतीच्या एलएसडी ड्रग्ज प्रकरणात फरार असलेल्या संशयित विनीश वाय. के. याला अटक केली आहे. संशयित केरळचा मूळ रहिवासी असून शिवोली येथे राहत होता. संशयिताला ७ डिसेंबर रोजी बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली.

एनडीपीएस कायदा, १९८५ च्या कलम २०(बी)(२)(बी), २२(सी), आणि ८(सी) सह कलम २९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे प्रकरण ११०.७० ग्रॅम एलएसडी लिक्विड जप्त करण्याशी संबंधित आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात ११ कोटी ७ लाख रुपये किंमत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

संशयित विनीश वाय. के. परदेशात पळून जाऊ नये यासाठी त्याच्याविरोधात सक्रिय लूकआऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते. या सर्कुलरच्या आधारावर, ब्युरो ऑफ इमिग्रेशनने त्याला बंगळुरू विमानतळावर ताब्यात घेतले.

याची माहिती मिळताच, एएनसी पोलिसांनी तातडीने बंगळुरूला जाऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, ट्रान्झिट रिमांड मिळवला आणि संशयिताला गोव्यात आणले. संशयिताला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी संशयिताला सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

SCROLL FOR NEXT