Goa Nightclub Fire: राज्यातील सर्व नाईट क्लबचे करणार 'ऑडिट', मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa Nightclub Fire Update: हडफडे येथील नाईट क्लबमध्ये आग लागून त्यात २५ जणांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व नाईट क्लबचे ऑडिट करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: हडफडे येथील नाईट क्लबमध्ये आग लागून त्यात २५ जणांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व नाईट क्लबचे ऑडिट करण्याचा आदेश सरकारने दिला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिली.

मडगावात सोमवारी ते पत्रकारांशी बोलत होते. हडफडे येथे घडलेली अगदी दुर्दैवी व अत्यंत वाईट घटना आहे. आपण मृतांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या शोकात सहभागी असून त्यांना हे दुःख सहन करण्याची देव शक्ती देवो, अशी प्रार्थना करतो, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी कालच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

Digambar Kamat
Goa ZP Election: 'झेडपी'साठी आरक्षण वैध! हायकोर्टाच्या आदेशावर 'सर्वोच्च' शिक्कामोर्तब

अशा दुर्घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी दंडाधिकारी चौकशी समिती नियुक्त केली असून ही समिती या घटनेची कसून चौकशी करेल व कुठल्या त्रुटींमुळे ही घटना घडली याचा सविस्तर अहवाल सरकारला सादर करेल.

Digambar Kamat
Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंचा थायलंडला पळ! 'लूक लाऊट' नोटीस जारी; गोवा पोलिसांचा दिल्लीत छापा

ज्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, त्याबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कदाचित प्रथमदर्शनी पुरावा सापडल्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई केली असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com