Goa Drishti Lifeguard Rescue Dainik Gomantak
गोवा

Goa Drishti Lifeguard Rescue: जलक्रीडा करताना बोट उलटली; तामिळनाडूतील जोडप्याला दृष्टी जीवरक्षकांनी वाचवले

दृष्टी जीवरक्षक गोव्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर तैनात असतात.

दैनिक गोमन्तक

Goa Drishti Lifeguard Rescue: गोव्यात कायमच पर्यटकांची रेलचेल सुरू असते. यामध्ये अनेकदा बीचवर धमाल मजामस्ती करण्याच्या नादात पर्यटक समुद्रात बुडण्याच्या घटनाही घडत असतात. यासाठी दृष्टी जीवरक्षक सर्व समुद्रकिनाऱ्यांवर तैनात असतात.

माहितीनुसार, मागील आठवड्यात, एका 27 वर्षीय झारखंडचा तरुण तो जेट-स्की चालवत होता, तेव्हा अचानक त्याचे संतुलन बिघडले. त्याला माजोर्डा समुद्रकिनाऱ्यावर वाचवण्यात आले. पण त्याला वाचवण्यासाठी आलेल्या जीवरक्षकाची बोट पाण्यात उलटली, तेव्हा त्याला दुसऱ्या जीव रक्षकाने मदत केली.

दुसऱ्या घटनेत, तामिळनाडूतील एक जोडपे सुट्टीसाठी गोव्यात दाखल झाले होते. ते पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर कयाकिंग करत असताना एका खडकाजवळ अडकले. मात्र जीवरक्षकांनी वाचवण्यापूर्वीच त्यांची सुटका झाली होती.

मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोघांना वाचवल्याची नोंद झाली आहे. राजस्थानमधील दोन पुरुष, जलक्रीडा करत असताना पाण्यात बुडाले. यावेळी जीवरक्षकांनी त्यांना नळीच्या सहाय्याने ऑक्सिजनचा पुरवठा केला आणि त्यांना जीव वाचवला.

दरम्यान, कळंगुट, बागा आणि कोलवा समुद्रकिनाऱ्यावर पाच मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. दृष्टी जीवनरक्षकांनी संबंधित घटनेत लक्ष घालून त्यांना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. बेपत्ता झालेल्यांमध्ये सर्वात लहान डिचोली येथील साडेतीन वर्षांचा मुलगा होता, तर सर्वात मोठा पाच वर्षांचा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

SCROLL FOR NEXT