एनआयआरएफ रँकिगनुसार देशातील टॉप 60 मध्ये आहे गोव्यातील 'हे' कॉलेज, आता मिळाले अ‍ॅक्रेडिएशन

तीन वर्षांसाठी मान्‍यता : दर्जेदार शिक्षण देणारे देशातील एक अग्रेसर महाविद्यालय
Goa College of Pharmacy
Goa College of PharmacyDainik Gomantak

Goa College of Pharmacy गोवा कॉलेज ऑफ फार्मसीला तीन वर्षांसाठी नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडिएशनकडून मान्यता मिळाली आहे. पोर्तुगीज काळापासून असलेल्‍या या महाविद्यालयाचे 1963 मध्ये गोवा कॉलेज ऑफ फार्मसी असे याचे नामकरण करण्यात आले.

हे समर्पित कॅम्पस असून गोवा सरकारच्या नेतृत्वाखाली आजवर दर्जेदार शिक्षण देत आले आहे. कॉलेजमधून आजवर अनेक चांगले फार्मासिस्ट तयार झालेत.

Goa College of Pharmacy
Goa GST Collection: जीएसटी संकलनात 32 टक्क्यांनी वाढ; मुख्यमंत्री म्हणतात, हा तर 'नवा विक्रम'

या कॉलेजचे माजी विद्यार्थी आज चांगल्या हुद्यावर पोहोचले आहेत. काहीजण उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, प्रतिष्‍ठित संस्थेचे प्रमुख, फार्मासिस्‍ट म्हणून ओळखले जातात.

गोवा कॉलेज ऑफ फार्मसी हे एक ब्रँड बनले आहे. हे एमएचआरडीद्वारे नुकत्याच केलेल्या एनआयआरएफ रँकिगनुसार देशातील टॉप 60 फार्मसी कॉलेजांपैकी एक आहे.

गोवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये, डिप्लोमा, बॅचलर इन फार्मसी, मास्टर इन फार्मसी (1992 मध्ये क्वालिटी अ‍ॅश्युरन्स, 2003 मध्ये फार्माकोलॉजी, 2010 मध्ये फार्माकग्नोसी आणि 2021 मध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री) ऑफर करते. गोवा कॉलेज ऑफ फार्मसी हे 2014 पासून पीएचडी प्रोग्रामसाठी मान्यताप्राप्त संशोधन केले आहे.

Goa College of Pharmacy
Offensive religious post: आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट, 'त्या' जुळ्या बहिणींना सशर्त जामीन मंजूर

एनबीए टीम सदस्यांशी संवाद

संस्थेला 2023 ते 2026 या तीन वर्षांसाठी मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एस. नाडकर्णी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विवेक कामत, प्रशासकीय समिती अध्यक्ष डॉ. प्रवीण खुल्लर, बर्नार्ड रॉड्रिगीस, डॉ. राजेश परब, प्रसाद तांबा, विवेक बेलोकर व इतरांनी एनबीए टीम सदस्यांशी संवाद साधला.

नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडिएशन टीमने (एनबीए) 13, 14, 15 जानेवारी 2023 रोजी गोवा कॉलेज ऑफ फार्मसीला भेट दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com