Zilla Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

goa district panchayat: जिल्हा पंचायत निवडणुकीवर एकूण ५ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीवर एकूण ५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. येत्या १२ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाकडून जारी केली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी विचारले असता ते म्हणाले, सर्वसाधारणपणे अधिसूचना ३० दिवस आधी जारी केली जाते. त्याआधी दोन तीन दिवस आधी मतदारसंघांचे आरक्षण जाहीर केले जाते. त्यानुसार ९-१० नोव्हेंबरला आरक्षण जाहीर केले जाते.

त्यासाठी यावेळी महिलांसाठी आरक्षित असलेला मतदारसंघ अन्य गटासाठी आरक्षित केला जातो. ज्या मतदारसंघात सर्व आरक्षणे लागू होऊन झाली, तेथे आरक्षण नसते. याच पद्धतीने याही वेळेस आरक्षण असेल.

ते म्हणाले, की भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदार यादी सर्वेक्षण, तपासणी आणि पुनरावलोकन याच काळात होणार असल्याने त्या कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी वगळून जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी वेगळे कर्मचारी उपलब्ध करावे लागतील. येत्या दोन दिवसांत राज्य प्रशासनासोबत विशेषतः मुख्य सचिवांसोबत त्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे.

राज्य घटनेने वेळेत निवडणूक घेण्याची जबाबदारी आयोगावर सोपवली आहे. त्यानुसार जानेवारीत झे़डपीची नवी समिती अस्तित्वात येणे आवश्यक आहे. १३ डिसेंबर ही मतदान तारीख निश्चित आहे.

‘झेडपी’साठी आॅक्टोबरची यादी अंतिम

भारतीय निवडणूक आयोगाच्या या मोहिमेचा आणि जिल्हा पंचायत निवडणुकीचा संबंध नसल्याचे सांगून ते म्हणाले, ऑक्टोबरसाठी प्रसिद्ध केलेली मतदार यादी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी अंतिम मानली गेली आहे. आता त्यात बदल होणार नाही. आता त्यात नवे नाव जोडता येणार नाहीत. साधारणतः साडेचार हजार कर्मचारी या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT