Subhash Shirodkar |Goa News
Subhash Shirodkar |Goa News  Dainik Gomanatk
गोवा

Subhash Shirodkar: मये विकासासाठी फेरसर्वेक्षण गरजेचे

दैनिक गोमन्तक

Subhash Shirodkar: पूर्वी मये गावात ज्याप्रकारची सुबत्ता नांदत होती, अगदी तशीच सुबत्ता पुन्हा नांदावी हेच माझे उद्दीष्ट असून मये गावच्या पुनर्विकासासाठी प्रत्यक्ष कोणत्या गोष्टींची गरज आहे, हे समजून घेण्यासाठी या गावाचे फेरसर्वेक्षण आवश्यक असून याची प्रक्रिया 2023 पर्यंत पूर्णत्वास नेऊ.

त्यानंतर मये गाव सुजलाम सुफलाम होण्यास बरीच मदत होईल,असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. शनिवार दि. 26 नोव्हेंबर रोजी भटवाडी मये येथील प्रभू स्मरण विश्रामगृहात अनुसया नवसो कारभाटकर चॅरिटेबल ट्रस्टच्या 14 व्या शिष्यवृत्ती वितरण समारंभात ते बोलत होते.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विनायक कारभाटकर, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, प्रा.कृष्णाजी कुलकर्णी, मयेचे सरपंच दिलीप शेट, जीवन विद्या मिशनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पालव, रुपेश ठाणेकर, मुख्याध्यापिका सिबल फर्नांडिस, तनुजा गोवेकर, मुख्याध्यापक बाळकृष्ण चव्हाण उपस्थित होते.

शिरोडकर पुढे म्हणाले, की पालकांनी आपल्या मुलांवर कोणत्याही गोष्टी लादू नयेत. त्याऐवजी त्यांना स्वतःचे क्षेत्र निवडण्यास प्रोत्साहित करावे. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले,की गेल्या 14 वर्षांपासून मये गावातील गरीब आणि पात्र विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठीचे ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे.

जीवन विद्या मिशनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पालव म्हणाले की, आदर्श समाज निर्माण करण्यासाठी कठोर प्रयत्नांसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. मयेचे सरपंच दिलीप शेट यांनी अनुसया नवसो कारभाटकर चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षी मयेतील विद्यार्थ्यांना मदत करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले. महामाया, विजयानंद आणि पैरा हायस्कूल, विजयानंद उच्च माध्यमिकच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या.

अभ्यासक्रम पूर्ततेसाठी शर्यत नको !

प्रा.कृष्णा कुलकर्णी यांनी सांगितले,की अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांच्या शर्यत सुरू असते. या शर्यतीबद्दल खेद व्यक्त करून अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधणे तेवढेच गरजेचे असून त्यांना विषयाचे ज्ञान मिळाले आहे का, हे समजून घेणे तेवढेच आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यापकांच्या सिलॅबस पूर्ण करण्याच्या शर्यतीमुळे विद्यार्थ्यांच्या आकलनावर परिणाम होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT