Goa development, Damu Naik Dainik Gomantak
गोवा

"इतर राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्‍याची विकासाच्‍या बाबतीत मोठी भरारी", दामू नाईकांचे प्रतिपादन; पर्वरी उड्डाणपुलाबाबत म्हणाले की.....

Damu Naik: लोकाभिमुख अर्थसंकल्‍प असल्‍याचे अर्थतज्‍ज्ञांनीही मान्‍य केले आहे. सर्वसामान्‍य माणसाला केंद्रस्‍थानी ठेवून त्‍याची रचना करण्‍यात आली आहे, असे दामू नाईक म्‍हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्‍य व केंद्र सरकारच्‍या सहकार्याने गोव्‍यात लोकाभिमुख, विकासाभिमुख प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहेत. साहजिकच इतर राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्‍याने विकासाच्‍या बाबतीत मोठी भरारी घेतली आहे, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्‍याच्‍या निमित्ताने ‘गोमन्‍तक’ने संवाद साधला असता नाईक बोलत होते. ते म्‍हणाले की, अलीकडे प्रत्‍येक विकासकामाला विरोध करण्‍याची वृत्ती वाढत चालली आहे. पण विरोधासाठी विरोध करू नये. पर्वरी येथे सध्‍या उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या कामामुळे नागरिकांना त्रास होतोय. वाहतुकीची कोंडी होतेय. परंतु लोकांनी थोडी कळ सोसली पाहिजे. आता लवकरच या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागेल. त्‍यानंतर याच लोकांना त्‍या पुलाचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्‍यांचा वेळ वाचेल, पैसा वाचेल. तेव्‍हा हेच लोक सरकारच्‍या या प्रकल्‍पाची स्‍तुती करतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

गोवा विधानसभेत मुख्‍यमंत्र्यांनी नुकत्‍याच सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पावर विरोधकांनी टीका केली. हा सर्व आकड्यांचा खेळ असल्‍याचे बोलले गेले. परंतु हा सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख अर्थसंकल्‍प असल्‍याचे अर्थतज्‍ज्ञांनीही मान्‍य केले आहे. सर्वसामान्‍य माणसाला केंद्रस्‍थानी ठेवून त्‍याची रचना करण्‍यात आली आहे, असे दामू नाईक म्‍हणाले.

गोमंतकीयांसाठी ही अभिमानास्‍पद बाब

गोवा हे लहान राज्‍य असूनही चांगली प्रगती साधली आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्‍या अहवालात गोव्‍याला आर्थिक आरोग्‍य निर्देशांकात देशात दुसरे स्‍थान मिळाले आहे. समस्त गोमंतकीयांसाठी ही अभिमानास्‍पद गोष्‍ट आहे.‍ आगामी काळात शैक्षणिक, सांस्‍कृतिक, आरोग्‍य, वैद्यकीय आणि सर्वच क्षेत्रांत मोठी भरारी घ्‍यायची आहे, असा विश्‍‍वासही नाईक यांनी व्‍यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT