Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: गोव्यात विक्रीस आणले जाणारे 36 कोटींचे ड्रग्स दिल्लीत जप्त, कळंगुटमधून महिलेला अटक

परदेशातून तस्करी ः केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs Case केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) परदेशातून गोव्यात आणले जाणारे ३६ कोटी रुपयांचे ५.२ किलो हेरॉईन दिल्लीत जप्त केले आहे.

या तस्करीप्रकरणी गोव्यातून एक महिलेला आणि दिल्लीत दोघांना अशा तिघांना अटक केली आहे. मूळ हैद्राबाद येथील महिला शैलजा सिरामशेट्टी (वय ४२) हिला डीआरआय अधिकाऱ्यांनी कळंगुट येथे अटक केली आहे.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मालवी येथून आलेल्या एका प्रवाशाकडून दिल्ली विमानतळावर हेरॉईनची पाकिटे जप्त केली. त्याची चौकशी केली असता त्याने हा ड्रग्स गोव्यात एका महिलेला देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले.

त्यानुसार डीआरआय अधिकारी या संशयिताला घेऊन गोव्यात आले व महिलेच्या अटकेसाठी सापळा रचला. महिला या संशयिताकडील ड्रग्स नेण्यासाठी आली असता तिला ताब्यात घेण्यात आले. ती ड्रग्स नेण्यासाठी हैद्राबाद येथून गोव्यात आली होती.

तिने हा ड्रग्स माल घेऊन ती दिल्लीला एका विदेशी नागरिकाला देण्यास जाणार असल्याचे सांगितले. त्यानुसार डीआरआय अधिकारी या महिलेला घेऊन दिल्लीला पोहोचले व तेथे नायजेरियन नागरिकाला अटक केली.

अधिकाऱ्यांचे मोठे यश

या आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश करण्यात डीआरआयच्या अधिकाऱ्यांना यश आले असून अधिक चौकशी सुरू आहे. यापूर्वीही दिल्लीमध्ये परदेशातून गोव्यात येणाऱ्या अंमलीपदार्थाचा साठा अनेकदा पकडण्यात आला आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्सची मागणी असल्याने तो परदेशातून तस्करी होत आहे.

बॅगेमध्ये सापडली हेरॉईनची पाकिटे

डीआरआयच्या मुख्यालय तसेच बंगळुरू विभागाला आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी दिल्ली विमानतळावरून गोव्यात होणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार या अधिकाऱ्यांनी मालवी व्हाया अदीस अबाबा येथून आलेल्या एका प्रवाशाला दिल्ली विमानतळावर अडवले. त्याच्याकडे असलेल्या ट्रॉली बॅगेची झडती घेतली असता आतमध्ये विविध कप्प्यांमध्ये हेरॉईनची पातळ पाकिटे लपवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT