गोव्यात रंगायचा बड्यांचा 'पोकर', यावेळी दिल्लीत केले नियोजन अन् डाव फसला; 30 जणांना बेड्या

पोलिसांनी पोकर गेम खेळणाऱ्या जुगाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे.
gambling zone
gambling zoneDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Delhi police arrested gamblers : दिल्लीतील काही बडे जुगारी अनेकदा गोव्यात पोकर गेम खेळायला जायचे. मात्र, यावेळी त्यांनी गोव्याला न जाता चक्क दिल्लीतील फार्महाऊसमध्येच पोकर गेम खेळण्याचे ठरविले.

दरम्यान पोलिसांनी या पोकर गेम खेळणाऱ्या जुगाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आयोजकांसह 30 आरोपींना अटक केली.

gambling zone
DRI Seize Drugs : कोट्यवधींच्या हेरॉईन तस्करीप्रकरणी गोवा, दिल्लीतील तिघांना अटक; डीआरआयची कारवाई

अमर उजाला या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील काही बडे जुगारी अनेकदा गोव्यात पोकर गेम खेळायला यायचे. ताब्यात घेण्यात आलेले सर्व जुगारी एकमेकांना आधीच ओळखत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

संशयित जुगारी विकासने संशयित प्रशांत गोयल आणि संशयित दमन सोधी या साथीदारांसोबत दिल्लीतील एका फार्महाऊसमध्ये पोकर गेम आयोजित करण्याचा कट रचला. त्यानुसार तीन आयोजकांनी दिल्लीतील वसंत कुंज येथे फार्महाऊसमध्ये पोकर गेमचे आयोजन केले. तसेच फार्महाऊस मालक नफ्यात 20 टक्के वाटा देत असत.

gambling zone
Calangute Accident : कळंगुटमधील भीषण अपघातात 18 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

गुन्हे शाखेचे विशेष पोलिस आयुक्त रवींद्र सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची गुप्त माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. निरीक्षक राजीव बमल यांच्या पथकाने माहितीच्या आधारे वसंत कुंज येथील फार्महाऊसवर छापा टाकला.

पोलिस उपायुक्त संजय भाटिया यांच्या देखरेखीखाली राजीव यांच्या टीमने फार्महाऊसमधील एका मोठ्या हॉलमधून 30 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन कार्ड शफलर आणि सात बाऊन्सर आहेत. घटनास्थळावरून 4 लाख 58 हजार 520 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Viswajit Rane Delhi visit
Modi Cabinet Reshuffle 2026
Satya Niketan Building Collapse Delhi
Colvale Jail Drugs Racket
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com