Deen Dayal Swasthya Seva Yojana Dainik Gomantak
गोवा

दीनदयाळ स्‍वास्‍थ्‍य सेवा योजना; विमा संरक्षणात दीड ते दोन लाख रुपयांची वाढ, सरकारकडून मोठा दिलासा

Deen Dayal Swasthya Seva Yojana: गोमंतकीय जनतेसाठी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने महत्त्‍वपूर्ण ठरणाऱ्या दीनदयाळ स्‍वास्‍थ्‍य सेवा योजनेत (डीडीएसएसवाय) सरकारने महत्त्‍वपूर्ण बदल केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोमंतकीय जनतेसाठी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने महत्त्‍वपूर्ण ठरणाऱ्या दीनदयाळ स्‍वास्‍थ्‍य सेवा योजनेत (डीडीएसएसवाय) सरकारने महत्त्‍वपूर्ण बदल केला आहे. तीन किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असलेल्या कुटुंबाला मिळणाऱ्या विमा संरक्षणात दीड लाख, तर चार किंवा त्‍यापेक्षा जास्‍त सदस्‍य असलेल्‍या कुटुंबांसाठीचे संरक्षण चार लाखांवरून सहा लाख रुपये केले आहे.

आरोग्‍य खात्‍याच्‍या अवर सचिव डॉ. पूजा मडकईकर यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटक आणि सामान्य नागरिकांना उच्च वैद्यकीय उपचारांच्या खर्चापासून वाचविणे हा ‘डीडीएसएसवाय’ योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत याआधी तीन किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असलेल्या कुटुंबाला २.५० लाखांचे विमा संरक्षण देण्‍यात

येत होते. त्‍यात दीड लाखाची वाढ करून सरकारने ते चार लाख केले आहे. तर, चार किंवा त्‍यापेक्षा जास्‍त सदस्‍य असलेल्‍या कुटुंबांसाठीचे संरक्षण चार लाखांवरून सहा लाख केले आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत किंवा पॅनेलमधील कोणत्याही सरकारी वा खासगी रुग्णालयात लाभार्थ्यांना ‘कॅशलेस’ उपचारांची सुविधा मिळते.

योजनेत लहान-मोठ्या व्याधी ते गंभीर आजारांपर्यंतच्या एकूण ४४७ विविध वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. जे नागरिक गोव्यात पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ राहात आहेत, त्‍यांना योजनेचा लाभ देण्‍यात येतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबांना प्रतिवर्षी २०० ते ३०० रुपयांचा हप्‍ता भरावा लागतो. या योजनेअंतर्गत देण्‍यात येणाऱ्या विमा संरक्षणात वाढ केल्‍याने त्‍याचा फायदा राज्‍यातील लाखो लोकांना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT