Goa Dam Water Storage Dainik Gomantak
गोवा

धरणांतील पाणीसाठा 10 दिवसांत 10 ते 12 टक्क्यांनी वाढला; पंचवाडी, गावणेत सर्वाधिक वाढ- जलस्रोत विभागाची आकडेवारी

Goa Dam Water Storage: गेल्‍या दहा दिवसांच्‍या काळात राज्‍यातील धरणांमधील पाणीसाठ्यात सरासरी दहा ते बारा टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गेल्‍या दहा दिवसांच्‍या काळात राज्‍यातील धरणांमधील पाणीसाठ्यात सरासरी दहा ते बारा टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे. या काळात राज्‍यात पावसाचे प्रमाण कायम राहिल्‍याने पंचवाडी आणि गावणे या धरणांतील पाणीसाठ्यात सर्वाधिक वाढ झाल्‍याचे जलस्रोत खात्‍याने जारी केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते. राज्‍यात यंदा ५ जून रोजी मान्‍सूनचा पाऊस दाखल झाला.

परंतु, त्‍यानंतर सलग पंधरा दिवस पावसाने राज्‍याकडे पाठ फिरवली. त्‍यामुळे सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात घट झालेली होती. त्‍यामुळे पुढील काही दिवस पाऊस न पडल्‍यास राज्‍यावर पाणीबाणीचे संकट येण्‍याची भीती जनतेत पसरली होती. परंतु, २१ जूनपासून मान्‍सूनच्‍या पावसाने कोसळण्‍यास सुरवात केली.

त्‍यानंतर गोव्‍यासह शेजारील महाराष्‍ट्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्‍याने उत्तर गोव्‍यासाठी महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या तिळारी धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झालेली आहे. दरम्‍यान, गेल्‍या काही दिवसांपासून धरण क्षेत्रांमध्‍ये मुसळधार पाऊस कायम आहे. त्‍यामुळेच धरणांतील पाणीसाठ्यात सातत्‍याने वाढ होत आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस कायम राहिल्‍यास काही धरणे लवकरच ‘हाऊसफुल्ल’ होतील, असे जलस्रोत खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणीसाठ्यातील वाढ (टक्‍क्‍यांत)

धरण २७ जून ७ जुलै

साळावली २८.६ ४२

अंजुणे ९.२ २१

आमठाणे ५४.१ ६६

पंचवाडी १८.२ ३७

चापोली ४४.५ ५४

गावणे ५०.९ ६९

तिळारी २८.७ ४३

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT