Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: दूध उत्पादकांना बाप्पा पावला! गोवा डेअरीकडून आधारभूत किंमत जाहिर

चतुर्थीची भेट: रक्कम वितरित; दूध उत्पादक खूष

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dairy गोवा डेअरीकडून राज्य सरकारच्या सहकार्याने ऐन चतुर्थीला दूध उत्पादकांना आधारभूत किमतीची रक्कम वितरित केल्याने दूध उत्पादकांसाठी ही खूष खबर ठरली आहे.

चतुर्थीला गणरायाच पावला, अशा शब्दात दूध उत्पादकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सात कोटींची ही आधारभूत किमतीची रक्कम सुमारे तीन हजार दूध उत्पादकांना मिळाली आहे.

गेला बराच काळ दूध उत्पादकांना आधारभूत किमतीची रक्कम अदा करायची राहून गेली होती. निधीची आवश्‍यकता आणि कागदोपत्री सोपस्कार यामुळे हे काम अडून राहिले होते, पण ऐन चतुर्थीला ही आधारभूत रक्कम मिळाल्याने सध्या दूध उत्पादक खुशीत आहेत.

गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर तसेच समितीचे डॉ. रामा परब व संदीप परब पार्सेकर यांच्या समितीने ही रक्कम वितरित करण्यासाठी पुढाकार घेतला.

विशेषतः समितीचे एक सदस्य डॉ. रामा परब यांनी दूध उत्पादकांना चतुर्थीला ही रक्कम वितरित करण्यासाठी आवश्‍यक कागदोपत्री कार्यवाही केली.

शिरोडकरांचे प्रयत्न

सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडे गोवा डेअरीचा ताबा असल्याने त्यांनी दूध उत्पादन वाढीबरोबरच डेअरीतील विविध समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असून दूध उत्पादकांना दिलासा देण्याबरोबरच प्रोत्साहनासाठीही प्रयत्न चालवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT