Goa Miles App: ...आणि म्हणूनच स्थानिक टॅक्सीचालक करताहेत ‘गोवा माईल्स’ला विरोध

कोलवा पोलिस स्थानकात बैठक: पर्यटकांना हॉटेलमधून घेऊन न जाण्याची मागणी
Goa Miles App
Goa Miles AppDainik Gomantak

Goa Miles App एका बाजूने गोवा सरकार संपूर्ण राज्याला ‘गोवा माईल्स’ या ॲप आधारित सेवेला जोडू पाहत असून दुसऱ्या बाजूने स्थानिक टॅक्सीचालकांचा ‘गोवा माईल्स’चा विरोध कायम आहे.

विमानतळावरून आलेल्या पर्यटकांना ‘गोवा माईल्स’मधून हॉटेलमध्ये सोडण्यास आमची काहीच हरकत नाही. मात्र, त्यांना हॉटेलमध्ये येऊन पर्यटकांना घेऊन जायला देऊ नये, अशी मागणी या टॅक्सीचालकांनी केली आहे.

गोवा माईल्स आणि स्थानिक टॅक्सीचालक यांच्यात सेवा देण्यावरून संघर्ष पेटू नये यासाठी आज कोलवा पोलिस स्थानकात त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस हेही उपस्थित होते.

वार्का टॅक्सीचालक संघटनेचे अध्यक्ष रोलंड फर्नांडिस यांनी गोवा माईल्सचे चालक पर्यटकांशी संधान बांधतात आणि हॉटेल्सवर येऊन त्यांना घेऊन जातात, असा आरोप करून हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. त्यामुळे स्थानिक टॅक्सीचालकांना व्यवसाय मिळत नसल्याचे सांगितले.

Goa Miles App
Goa Temple Theft Case: सुशेगातपणा भोवतोय! मंदिरं बनताहेत असुरक्षित; सर्वणमध्ये सुवर्णालंकारांसह लाखोंचा ऐवज लंपास

‘गोवा माईल्स’चे हेमंत प्रभूचोडणेकर यांनी यावेळी ‘गोवा माईल्स’ सेवा हॉटेल्ससाठीही सुरू केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

‘व्यवसायात सर्वांना मुभा’ : कोलवाचे पोलिस निरीक्षक थेरन डिकॉस्ता यांनी सर्वांना सगळीकडे व्यवसाय करण्याची मुभा असून जर कोणीही कायदा आणि सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केला, तर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

आमदार व्हिएगस यांनी स्थानिक टॅक्सीचालकांना पर्यटन व्यवसायातून हद्दपार करण्यासाठीच गोवा सरकारने ‘गोवा माईल्स’ सेवा आणल्याचा आरोप केला. वास्तविक स्थानिक टॅक्सीचालकांचे हित राखण्यासाठी स्वतंत्र कायदा आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com