Dabolim Diarrhea Outbreak Dainik Gomantak
गोवा

Dabolim Diarrhea Outbreak: दाबोळीत अतिसारचा उद्रेक! एकाच इमारतीतील रुग्णसंख्या 150 वर, परिस्थिती गंभीर; घरोघरी जाऊन तपासणी सुरु

Health Crisis in South Goa: दाबोळी येथील ‘प्रभू व्हायोलेटा’ इमारतीत अतिसाराच्या आजाराचा उद्रेक झाला आहे. तेथील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत दीडशेवर पोहोचली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: दाबोळी येथील ‘प्रभू व्हायोलेटा’ इमारतीत अतिसाराच्या आजाराचा उद्रेक झाला आहे. तेथील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत दीडशेवर पोहोचली आहे. सुरुवातीला सुमारे ६५ प्रकरणे आढळल्यानंतर आता परिस्थिती गंभीर बनली असून दूषित पाणी हे यामागील मुख्य कारण असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्र व एकात्मिक रोग निगराणी कार्यक्रम (IDSP) यांच्या पथकांनी परिसरात सर्वेक्षण व जनजागृती मोहीम सुरू केली आहे. घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली जात आहे. नागरिकांना पिण्यासाठी उकळलेले पाणी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागालाही पाणीपुरवठा व पाईपलाईनची सखोल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवले असून संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रहिवाशांनी वास्को पोलिसांशी संपर्क साधत जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

बोअरवेलचा पाणीपुरवठा थांबवला

आरोग्य सेवा संचालनालयाने बोअरवेल, भूमिगत टाकी तसेच पाण्याच्या टाक्यांमधून नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले आहेत. त्‍यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. बोअरवेलचे पाणी दूषित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करत त्याचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Tension: इराणचा महा-अल्टीमेटम! 7 अटी मान्य करा अन्यथा... तेहरानने उडवली 'महासत्ते'ची झोप; कतार-पाकिस्तानच्या मध्यस्थीने थेट मेसेज

India Development Conference: 'विकसित भारत'साठी खासगी गुंतवणुकीला चालना; राज्यांच्या भांडवली खर्चाचे लक्ष्य ३ टक्क्यांपर्यंत नेण्यावर चर्चा

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबारामागे 'सूरज'चा हात? कॅसिनो व्यवसायाशी संबंधित कारणाचा पोलिसांना संशय; तपास निर्णायक टप्प्यात

LPG Subsidy New Rule: 1 ऑक्टोबरपासून मोठा दणका! बायोमेट्रिक आधार नसेल तर बंद होणार एलपीजी सब्सिडी; ग्राहकांसाठी नवा कडक नियम जाहीर

Goa Politics: आघाडीसाठी काँग्रेसची कवाडे खुली; भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार, राज्यभर 'गोवा रक्षण यात्रा'

SCROLL FOR NEXT