increase in cyber fraud cases in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: सावधान गोमंतकीयांनो! तीन महिन्यांत 1030 जण सायबर भामट्यांच्या जाळ्यात; मार्चपर्यंत तब्बल 25 कोटींचा गंडा

Goa Cyber Crime Statistics 2026: गोव्यात सायबर भामट्यांनी अगदी धुमाकूळ घातला असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत गोव्यात या सायबर भामट्यांच्या पाशात एकूण १०३० गोवेकर सापडले असून या तीन महिन्यांत गोवेकरांना तब्बल २५ कोटींचा फटका बसला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: गोव्यात सायबर भामट्यांनी अगदी धुमाकूळ घातला असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत गोव्यात या सायबर भामट्यांच्या पाशात एकूण १०३० गोवेकर सापडले असून या तीन महिन्यांत गोवेकरांना तब्बल २५ कोटींचा फटका बसला आहे.

‘डिजीटल अरेस्ट’ची एकूण १५ प्रकरणे गेल्या तीन महिन्यांत उघडकीस आल्याने याच प्रकरणांवर लोकांचे लक्ष केंद्रित झाले असले तरी अन्य प्रकारेही गोव्यातील लोकांना सायबर भामट्यांनी लुटले असून सरासरी दर दिवशी १० जण गोव्यात या चोरट्यांच्या जाळ्यात सापडत आहेत. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गोव्यात सायबर गंड्यांची प्रकरणे ६४ टक्क्यांनी वाढली आहेत.

यातील बरेचजण सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या बनावट जाहिरातींचे बळी ठरले, तर ‘क्यू आर कोड स्कॅम’द्वारे बऱ्याच जणांना गंडवले गेले आहे. केपेतील एका युवतीला एअर इंडियात नोकरी देण्याचे आमिष दाखवून सव्वा लाखाला लुटले होते. कर्ज देण्याच्या बहाण्यानेही काहीना लुटले असून काहीना अश्लील फोटो आमच्याकडे आहेत आणि आम्ही ते व्‍हायरल करू, असे सांगून लोकांना ब्‍लॅकमेल केल्याच्या घटना घडल्‍या आहेत.

१९३० क्रमांकावर तक्रार करा!

सायबर चोरट्यांपासून बचाव करायचा असेल तर अनोळखी क्रमांकावरुन आलेले कॉल्‍स अटेंड करु नका वा अनोळखी नंबरवरुन आलेल्‍या लिंक्‍स ओपन करू नका. कुणालाही सायबर चोरट्यांकडून संपर्क झाला आहे, असे वाटत असल्‍यास वा खरेच असा फटका बसला असल्‍यास त्‍यांनी त्‍वरित १९३० या क्रमांकावर आपली तक्रार नाेंदवावी, असे सायबर पोलिस विभागाने कळवले आहे.

गाेव्‍यात डिजिटल ‘अरेस्‍ट’च्‍या घटनात वाढ झाली आहे. कित्‍येकवेळा व्‍हॉटसॲपवरुन कॉल करून आम्‍ही सीबीआय किंवा इडीचे अधिकारी असे सांगून लोकांना त्‍यांच्‍या नावाचे बनावट वॉरंट दाखवून ब्‍लॅकमेल केले जाते. त्‍यांना पैसे भरण्‍याची सक्‍ती केली जाते.यंदा गोव्‍यात अशी १५ प्रकरणे नाेंद झाली. वास्‍तविक फोनवरून कुणीही कुणाची चौकशी करू शकत नाही. याची जाणीव लोकांनी ठेवावी व कुणाला असा फोन आल्‍यास त्‍यांनी पैसे न भरता याची माहिती १९३० वर द्यावी.

- राजू राऊत देसाई पोलिस अधीक्षक, सायबर पोलिस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT