Sexual Assault Case Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault Case: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी

Goa Sexual Assault Cases: मायणा-कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या यशवंत हरिजन (वय २६) याला अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या यशवंत हरिजन (वय २६) याला अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.

गेल्या वर्षभरापासून तो पीडितेवर अत्याचार करत होता. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांच्याशी संपर्क साधून पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयिताला अटक केली.

दरम्यान, यशवंत हा बस चालक असून तो रुमडामळ, दवर्ली येथे राहतो. तो मूळचा बेळगाव येथील आहे. पीडिता मडगाव येथे टेलरिंग वर्गाला जात असताना त्याने तिच्याशी गोड बोलून मैत्री केली व नंतर विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली.

यशवंत हा गेल्या वर्षभरापासून पीडितेवर अत्याचार करीत आहेत. वेगवेगळी आमिषे दाखवत होता. त्याने तिची फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी संशयिताविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत कलम ४ व ६ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT