Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

Goa marine export decline 2026: कोळंबी, शेवंड, लॉबस्टर, खेकडे, मासे, कवचधारी जलचर आणि इतर सागरी उत्पादनांच्या निर्यातीत २०२२-२३ आणि २०२३-२४ च्या तुलतेने २०२४-२५ मध्ये घट झाली
Goa Marine Export
Goa Marine ExportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशभरात उत्पादित होत असलेल्या कोळंबी, शेवंड, लॉबस्टर, खेकडे, मासे, कवचधारी जलचर आणि इतर सागरी उत्पादनांच्या निर्यातीत २०२२-२३ आणि २०२३-२४ च्या तुलतेने २०२४-२५ मध्ये घट झालेली दिसत आहे, तर दुसरीकडे मात्र उत्पादनांचे दर वाढल्याने २०२३-२४ च्या (६०,५२३.८९ कोटी) तुलनेत २०२४-२५ मध्ये ६२,४०८.४५ कोटींचा महसूल मिळाला असून, ते १ हजार ८८४.५६ कोटींनी अधिक आहे.

दरम्यान, गोव्याचा विचार केला तर सागरी साधनसंपत्तीची निर्यात २०२३-२४ मध्ये २०४.३० कोटींची (४८१४ मे.टन) निर्यात झाली होती, २०२४-२५ मध्ये मात्र ही निर्यात ७१.५२ कोटींची (१७८१ मे.टन) राहिली. नैसर्गिकरीत्या पकडलेल्या मासळीची २०२३-२४ मधील निर्यात ७२९.९० कोटींची (५०३५० मे.टन) होती, तर २०२४-२५ मध्ये ७१७.२९ कोटींची (४३६८८ मे.टन) राहिली आहे. यावरून गोव्यातील मासळी उत्पादन निर्यात घटल्याचे स्पष्ट दिसते.

Goa Marine Export
Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

सर्वाधिक मासळी निर्यातीत गुजरात पहिल्या क्रमांकावर राहिला असून, या राज्याने २०२३-२४ मध्ये २ लाख ७४ हजार ६२३ मे. टन, तर २०२४-२५ मध्ये २ लाख ६७ हजार ३८१ मे. टन मासळीची निर्यात केली आहे. इतर साधनसंपत्ती निर्यातीचा विचार केला तर याच राज्याने २०२३-२४ मध्ये ९,४६५ मे. टन, तर २०२४-२५ मध्ये १४ हजार ७७७ मे. टन निर्यात करून पहिले स्थान पटकावले आहे.

सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण'' (एमपीईडीए) या केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संस्थेने ही निर्यातीचा तपशील दिला आहे. लोकसभेत जनता दलाचे खासदार दिलेश्वर कामेत यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला उत्तरात केंद्रीय केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी लेखी उत्तरातून वरील आकडेवारी दिली आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान, भारताने सुमारे १.६९ दशलक्ष टन सागरी उत्पादनांची निर्यात केली. या निर्यातीचे मूल्य अंदाजे ७.४५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके होते..यामध्ये ''गोठवलेल्या कोळंबीचा'' (फ्रोझन श्रीम्प) वाटा निर्यातीच्या एकूण मूल्याच्या सुमारे ६९ टक्के इतका होता, असेही एमपीईडीएने स्पष्ट केले आहे.

सागरी साधनसंपत्ती निर्यात

२०२०-२१- ३,९११

२०२१-२२- ३,४३९

२०२२-२३- ३,८११

२०२३-२४- ४,८१७

२०२४-२५- १,७८१

Goa Marine Export
Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

मासळीची निर्यात

२०२०-२१- १२,६३८

२०२१-२२- ३२,६१८

२०२२-२३- ५९,५२३

२०२३-२४- ५०,३५०

२०२४-२५- ४३,६८८

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com