Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: थिवी येथील मारहाण प्रकरणातील संशयिताची सशर्त जामीनवर सुटका

Goa Crime Case: डिचोली प्रथम श्रेणी न्यायाधीश अनुराधा आंद्रादे यांनी संशयिताचा जामीन अर्ज मंजूर केला.

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: थिवी येथे शुल्लक कारणावरून चुलत्याला मारहाण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अटक केलेल्या सागर सुरेश शिरोडकर (36) याची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती प्राप्त होतेय.

संशयितास 25 हजार रूपये हमी रक्कम व तितक्याच रकमेचा हमीदार, न्यायालयात आरोपपत्र सादर होईपर्यंत थिवी गावात प्रवेश न करणे, समान गुन्हा न करणे, तक्रारदार किंवा या गुन्ह्याशी निगडित लोकांना धमकी किंवा आमिष दाखवण्याचा प्रयत्न करू नये, अशा अटीनुसार डिचोली प्रथम श्रेणी न्यायाधीश अनुराधा आंद्रादे यांनी संशयिताचा जामीन अर्ज मंजूर केला. संशयिताच्यावतीने न्यायालयात अ‍ॅड. विनायक पोरोब यांनी युक्तीवाद केला.

दरम्यान, मंगळवारी 12 मार्च रोजी, संशयित सागर शिरोडकर याने फिर्यादी उदय सिताराम शिरोडकर (53) या आपल्या स्वतःच्या चुलत्यावर कोंबड्या व लाकडे चोरल्याचा आरोप करीत लाकडी दंडुकाने मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी भादंसंच्या 324, 504 व 506(2) कलमांतर्गत गुन्हा नोंदवून संशयित सागर शिरोडकर यास गुरूवारी 14 रोजी अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT