Panaji Police Constable Bogus Medical Certificate: Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पणजीतील पोलिस कॉन्स्टेबलने रजेसाठी दिले बोगस मेडिकल सर्टिफिकेट; सेवेतून केले निलंबित

बनवेगिरीचा गुन्हा दाखल; सहावेळा केली बनावट सही

दैनिक गोमंतक

Panaji Police Constable Bogus Medical Certificate: रजेसाठी मये प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची बनावट सही करून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पणजी पोलिस स्थानकातील कॉन्स्टेबल नितेश चोडणकर याच्याविरुद्ध बनवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खात्यांतर्गत चौकशीत दोषी आढळल्याने त्याला गेल्या आठवड्यात सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

गोवा पोलिस खात्याने कॉन्स्टेबल नितेश चोडणकर याने आजारी रजेचा अर्ज मये प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या सहीनिशी सादर केला होता त्याची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

या अर्जावर मये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सिद्धी कासार यांची सही असल्याने त्यांच्याकडे या अर्जाबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले.

त्यांनी स्पष्टीकरण करताना या कॉन्स्टेबलला केंद्रातून आजारी रजा देण्यात आलेली नाही व त्यावरील सही त्यांची नसल्याचे सांगितल्याची माहिती दिली होती. आरोग्य केंद्रातही त्याच्या या सहा बनावट रजेच्या अर्जाची नोंदही नाही.

त्यामुळे हे सर्व अर्ज बनावट असल्याचा अहवाल डॉ. कासार यांनी पोलिस खात्याला पाठविला होता. या अहवालाच्या आधारे कॉन्स्टेबल नितेश चोडणकर याला बोलावून चौकशी केली असता तो स्पष्टीकरण देऊ शकला नाही. त्याने हे रजेचे अर्ज पणजी पोलिसात दाखल केले होते.

त्यामुळे बनावट सहीप्रकरणी डॉ. कासार यांनी पणजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याने हे रजेचे अर्ज पणजी पोलिसात दाखल केले होते.

सहावेळा बनावट सहीचा वापर

संशयित कॉन्स्टेबल नितेश चोडणकर याने आजारी रजेच्या अर्जावर स्वतःच मये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धी कासार यांची बनावट सही केली होती.

तसेच या अर्जावर गोवा सरकारचा अशोक स्तंभाचा शिक्का त्याने मारून तो अर्ज पणजी पोलिसात दाखल केला होता.

त्याने हा प्रकार सहावेळा करताना सहावेळा बोगस रजेचे अर्ज सादर केले होते. त्याने सादर केलेल्या या रजेच्या काही अर्जावरील सहीमध्ये तफावत आढळून आल्याने त्याची चौकशी गोवा पोलिस खात्यामार्फत करण्यात आली. या चौकशीत तो दोषी आढळून आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

SCROLL FOR NEXT