threatening former Aldona MLA Glenn Ticlo | Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

माजी आमदार ग्लेन टिकलो यांना जीवे मारण्याची धमकी! कारचेही केले नुकसान; वाचा सविस्तर प्रकरण

भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

नुकत्याच झालेल्या रोड-रेज घटनेत हळदोणाचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांना धमकावल्या आणि त्यांच्या कारचे नुकसान केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11.45 वाजता आमदार ग्लेन टिकलो कळंगुट येथील एका रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना एका दुचाकीस्वाराने रस्ता अडवत असल्याचा दावा करत त्यांच्याशी वाद घातला. (Threatening former Aldona MLA Glenn Ticlo)

हा वाद पुढे वाढला आणि सर्वेश दिवकर या दुचाकीस्वाराने त्याच्या दोन मित्रांना घटनास्थळी बोलावले आणि तिघांनी टिकलो यांच्या कारची नासधूस करायला सुरुवात केली. तसेच त्यांना व कारमध्ये असलेल्या अन्य एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकीही त्या तिघांनी दिली.

माल्कम फर्नांडिस आणि जेलोन अशी या दोन मित्रांची नावे आहेत. दिवकर आणि फर्नांडिस हे दोघे नागोवा येथील रहिवासी असून कळंगुट पोलिसांनी त्यांना अटक केली.

भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT