Youth fight in Madgaon  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मडगावात 'गन-पॉइंट' ड्रामा! एका मुलीसाठी दोन तरुण आमनेसामने, वाद चिघळला आणि काढली बंदूक

Madgaon Gunpoint Case: एका मुलीवरून झालेल्या वादातून दोन गटांमधील भांडणाने सोमवारी रात्री हिंसक वळण घेतले

Akshata Chhatre

मडगाव: एका मुलीवरून झालेल्या वादातून दोन गटांमधील भांडणाने सोमवारी (दि.२५) रात्री हिंसक वळण घेतले. या भांडणात एका युवकाने पिस्तूल रोखून धमकी दिल्याची खळबळजनक घटना मडगावातील होली स्पिरीट बसस्थानकाजवळ घडली. या घटनेनंतर फातोर्डा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याला थांबवून पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावण्यात आले. विशेषतः मुंगूल येथील ‘गँगवार’ घटनेनंतर याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा बंदुकीचा वापर झाल्याने स्थानिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

फातोर्डा पोलिसांची तत्पर कारवाई

या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक नथन अल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली फातोर्डा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद दोन युवकांमधील वैयक्तिक शत्रुत्वातून आणि एका मुलीवरून झाला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर एका संशयिताला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले, तर उर्वरित दोघांना कोलवा परिसरातून अटक करण्यात आली.

आरोपींवर गुन्हा दाखल

पोलिसांनी या तिघा संशयितांवर ‘अन्यायकारक प्रतिबंध’ आणि ‘गुन्हेगारी धमकी’ या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. होली स्पिरीट चर्चजवळ गाडी थांबवून पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून फातोर्डा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि लवकरच यामागील पूर्ण सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decision: स्थानिकांना 1000 सरकारी नोकऱ्या मिळणार, गोव्यात युनिटी मॉलसह 7 मोठे प्रकल्प उभे राहणार; मंत्रिमंडळात CM सावंतांचा मोठा निर्णय

Goa Politics: खरी कुजबुज, तवडकर- गावडे वाद कशासाठी?

Omkar Elephant: 'ओंकार' शेतमळ्यांच्या प्रेमात, तांबाेसेत वाढला मुक्काम; शेतकरी मात्र हैराण

Goa Murder Case: गोव्यात 64 वर्षीय वृद्ध महिलेचा चाकूने गळा कापला; आसामच्या 21 वर्षीय तरुणाला अटक

Guirim Road Issue: गिरीतून जात आहात...तर सावधान! महामार्गावर लोखंडी सळ्या व खड्डे; दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT