Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कौटुंबिक वादाचा भडका, मयेत सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला; संशयिताला बेड्या

Mayem Crime News: उत्तर गोव्यातील मये परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

डिचोली: उत्तर गोव्यातील मये परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शुल्लक कारणावरून किंवा जुन्या वादातून रक्ताचे नाते विसरून एका सख्ख्या भावाने दुसऱ्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात धाकटा भाऊ गंभीर जखमी झाला असून परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी संजय माईणकर याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.

जुन्या वादातून रक्ताचे नाते विसरले

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माईणकर कुटुंबियांमध्ये पूर्ववैमनस्यातून धुसफूस सुरू होती. याच वादाने रौद्र रूप धारण केले. संशयित आरोपी संजय माईणकर याचे धाकटा भाऊ सागर याच्याशी जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात संजयने सागरवर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की सागर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

जखमीवर 'गोमेकॉ'त उपचार सुरू

घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी तातडीने धाव घेत जखमी सागर याला उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) दाखल केले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते असून, डॉक्टर त्याच्यावर शर्थीचे उपचार करत आहेत. रक्ताच्या नात्यानेच पुकारलेल्या या युद्धामुळे मये ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संशयित संजय माईणकर याला पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्राथमिक तपासात हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जमिनीचा वाद, मालमत्ता किंवा वैयक्तिक कारणातून हा प्रकार घडला असावा, या दिशेने आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT