head injury crime case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 75 वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला, डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी; म्हापसा हादरले

Elderly man attacked Goa: गोव्यातील म्हापसा शहरात एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

Akshata Chhatre

म्हापसा: गोव्यातील म्हापसा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावस वाडा, म्हापसा येथे रविवार(दि. ८) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ७५ वर्षीय जमाल अहमद यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला. रस्त्यावरून चालत असताना हल्लेखोराने एक मोठा दगड उचलून थेट त्यांच्या डोक्यात मारला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, जमाल अहमद हे आपल्या नेहमीच्या मार्गाने चालले होते. त्यावेळी अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. कोणताही वाद किंवा कारण नसताना झालेल्या या हल्ल्यामुळे अहमद यांना मोठा धक्का बसलाय. डोक्यात दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि रस्त्यावरच कोसळले.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी जमाल अहमद यांना तातडीने म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि अधिक तपासणीसाठी, त्यांना नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे सीटी स्कॅनसाठी पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी, अशाप्रकारे भरदिवसा झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांत तक्रार दाखल, तपास सुरू

पीडित जमाल अहमद यांच्या कुटुंबियांनी अज्ञाताविरोधात म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची नोंद घेतली असून, हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी अधिक तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे म्हापसा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे, आणि हल्लेखोराला लवकर पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT