Goa Crime: कळंगुटमध्ये पर्यटकांचा हल्ला, विजेच्या खांबावर आपटले डोके; ओळख न पटविल्याने खूनप्रकरणी 15 संशयित निर्दोष

Calangute Murder: जयेश भंडारी याच्या खूनप्रकरणातील १५ संशयितांना म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष ठरवले.
Goa Crime
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जयेश भंडारी याच्या खूनप्रकरणातील १५ संशयितांना म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष ठरवले. भंडारी याचा मृत्यू त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे झाल्याचे दस्तावेजात स्पष्ट होत असले तरी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींनी संशयितांची ओळख पटवली नाही. त्यामुळे सरकारी वकील खुनाचा आरोप संशयापलिकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

तिवाईवाडा - कळंगुट येथील एका गेस्ट हाऊसजवळ १ जानेवारी २०१८ रोजी रात्री ८ च्या सुमारास काही पर्यटक रेमी रिबेलो व त्याचा मित्र अभिलाश पाटील या दोघांना दंडुक्याने मारहाण करत होते. त्या दोघांना होत असलेली मारहाण पाहून त्यांचे मित्र राजेश बिरोडकर व राजेश भंडारी त्या पर्यटकांना जाब विचारू लागले.

यावेळी या पर्यटकांनी जयेश व राजेश या दोघांवर हल्ला चढविला. जयेश याचे डोके तेथे असलेल्या विजेच्या सिमेंट काँक्रिटच्या खांबावर आपटले, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. या हल्‍ल्यात राजेश हा सुद्धा गंभीर जखमी झाला. या मारहाणीनंतर पर्यटक बसने तेथून पसार झाले. जयेश याला गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी नेले असता त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे कळंगुट पोलिसांनी अज्ञात पर्यटकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

Goa Crime
Vasco Crime: धाकट्या भावावर 3 गोळ्या झाडल्या तरीही मिळाला जामीन; नेमकं प्रकरण काय? वाचा

कळंगुट पोलिसांनी या हल्ला करणाऱ्या के. श्रीनिवास (४०), ए. दर्शन (४५), सय्यद उस्मान (५०), प्रशांत रेड्डी (४५), सय्यद बद्रुद्दिन (४०), पुरुषोत्तम रेड्डी (३५), नरसिंम्‍हा रेड्डी (४२), एस. अंजया(५२), डी. श्रीनिवास (३२), सी. कृष्णा (५२), एम. किरन (२७), बी. अंजीनेलू (३८), के. भापाळ(४५), ई. देवानंद (५२), ए. अंजनेयेलू (४८) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना २ जानेवारी २०१८ रोजी अटक करण्यात आली व त्यांना १४ दिवसांच्या कोठडीनंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती.

Goa Crime
Cyber Crime: क्रिप्टो व्यवहारांचा वापर करून फसवणूक, गुजरातच्या तरुणाला कळंगुट येथे अटक

परिस्थितीजन्य पुरावा सादर

साक्षीदाराच्या अपुऱ्या पुराव्यामुळे संशयितांविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सादर केलेले पुरावे अपुरे आहेत. सुनावणीवेळी परिस्थितीजन्य पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांना निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे न्यायालयाने निवाड्यात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mandar Surlkar Case
Goa High Court Premature Release
 Anmod Forest Murder Case
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com