Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कळंगुट हादरलं! 15 वर्षांपासून काम करणाऱ्या केअरटेकरची फावड्याने वार करुन निर्घुण हत्या; संशयित पोलिसांच्या ताब्यात

Calangute Crime News: कळंगुटमधून एक धक्कादायका बातमी समोर आली आहे. येथील परोबोवाडो येथे एका वृद्ध व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली.

Manish Jadhav

कळंगुट: कळंगुटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील परोबोवाडो येथे एका वृद्ध व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. 15 वर्षांहून अधिक काळ एका मालमत्तेचा केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी मृतासोबत राहणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. मृत व्यक्ती मूळची पश्चिम बंगालची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती परोबोवाडो येथील एका मालमत्तेची देखरेख करण्याचे काम अनेक वर्षांपासून करत होती. या वृद्धाचा मृतदेह त्याच्या खोलीपासून साधारण 15 ते 20 मीटर अंतरावर आढळून आला. मृताच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर 'फावड्या'सारख्या धारदार वस्तूने हल्ला करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेवेळी मृतासोबत खोलीत राहणारी दुसरी व्यक्तीही तिथे उपस्थित होती. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने एक वेगळाच दावा केला. "चार अनोळखी व्यक्तींनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला आणि केअरटेकरवर हल्ला करुन पळ काढला," असे या संशयिताने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता, त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने आवारात प्रवेश केल्याचे किंवा बाहेर पडल्याचे चित्रण आढळलेले नाही. यामुळे संशयिताचा हा दावा खोटा असल्याचे प्राथमिक तपासात दिसत असून पोलिसांनी त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलीस तपास वेगाने सुरु

कळंगुट (Calangute) पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. "प्राथमिकदृष्ट्या ही हत्या परस्पर वादातून किंवा वैयक्तिक कारणातून झाल्याचे दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि संशयिताचा जबाब यामध्ये मोठी तफावत असल्याने गुन्हा उकलणे आता सोपे होईल," असे पोलीस सूत्रांनी सांगितले. 15 वर्षे विश्वासू म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे शेवट झाल्याने स्थानिक हळहळ व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT