Goa Crime: सोनं, रोकड अन् महागडे गॅजेट्स... पेडण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 53 लाखांच्या मुद्देमालासह दोघे अटकेत

Pernem Theft: उत्तर गोव्यातील पेडणे पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: उत्तर गोव्यातील पेडणे पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेडणे आणि आसपासच्या परिसरात घरफोडीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ५३.६८ लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

दोन संशयितांना बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरफोडी प्रकरणात रोहन महादेव पडवळ (वय २९, रा. वरपे वाडो, पेडणे) आणि जगन्नाथ ऊर्फ केतन संजय बागकर (वय २०, रा. रामनगर, कोलवाळ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांनी पेडणे तालुक्यासह इतर लगतच्या भागांत अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

Goa Crime
Goa Fire News: चोर्ला घाटात पहाटेच्या सुमारास भीषण आग, बोलेरो टेम्पो जळून खाक; 5 लाखांचे नुकसान

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत सोन्याचे दागिने, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रोख रक्कम असा एकूण ५३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अलीकडच्या काळातील पेडणे पोलिसांची सर्वात मोठी वसुली मानली जात आहे. सण-उत्सवाच्या काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांवर या कारवाईमुळे काही प्रमाणात लगाम बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Goa Crime
Goa Crime: सावधान! एसी सर्व्हिसिंगच्या नावाखाली लूट; उत्तर प्रदेशातील दोन भामटे मडगावात जेरबंद

या गुन्ह्यात अजून कोणाचे हात गुंतले आहेत का? तसेच या आरोपींनी गोव्याच्या इतर भागांतही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे पथक करत आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्याची प्रक्रिया कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर सुरू केली जाईल. नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षा वाढवावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com