Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: पोलिसांची आगळीक सुरूच, राज्यात खाकी वर्दीला काळीमा फासणाऱ्या घडामोडी; सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Goa Police: खाकी वर्दीला काळीमा फासणारी काही उदाहरणे समोर आली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Violation of Law by Goa Police: हल्लीच एका पोलिसाने चोराच्या कमाईतील हिस्सा मागितल्याबद्दल त्याच्यावर कारवाई झाली होती. एका अधिकाऱ्याने डान्स बारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता.

रक्षकच कायद्याचे उल्लंघन करत असतील तर तेथे सुव्यवस्था कशी प्रस्थापित होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात असतानाच खाकी वर्दीला काळीमा फासणारी अशीच काही उदाहरणे समोर आली आहेत.

बाणस्तारी अपघात प्रकरण; पोलिस अधीक्षकही रडारवर

बाणस्तारी अपघातातील मर्सिडीस कारचालक परेश सावर्डेकर याला वाचवण्यासाठी घटनेच्या रात्री रचलेल्या षडयंत्रात एका माजी मंत्र्याचा मुलगा, तसेच एक पोलिस अधीक्षकही गुंतला असल्याचे क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने आतापर्यंत केलेल्या तपासकामात समोर आले आहे. त्याचे पुरावेही गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकरणाचा तपास म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाकडे दिल्यापासून त्या अपघाताच्या रात्री घडलेल्या कट-कारस्थानातील अनेक गोष्टींचा उलगडा होऊ लागल्याने पोलिस खात्यातही खळबळ उडाली आहे.

अपघातातील पुरावे नष्‍ट करण्यासाठी कट-कारस्थान रचल्यानंतर ‘आप’चे नेते ॲड. अमित पालयेकर यांनी पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांच्याशी संपर्क साधून कारचालक गणेश लमाणी पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले होते.

यासंदर्भात एका पोलिस अधीक्षकानेही म्हार्दोळ पोलिसांना फोन करून या प्रकाराबाबत चर्चा केली होती, अशी माहिती क्राईम ब्रँचने नोंदवलेल्या पोलिसांच्या जबानीमधून समोर आली होती. या प्रकरणात संशयित परेशवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित गणेश लमाणी तसेच ॲड. अमित पालेकर यांना या पथकाने अटक केली.

जामीन देताना न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पालेकर यांनी आपला मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द केला तसेच लमाणी याचाही मोबाईल जप्त केला आहे.

अपघाताच्या रात्री कुंडई औद्योगिक वसाहतीत परेश, अमित आणि गणेश यांच्या व्यतिरिक्त आणखी काही व्यक्ती उपस्थित होत्या, त्यांच्या जबान्या नोंदवल्या आहेत.

म्हार्दोळ पोलिसांचे जबाब नोंदवून या कट-कारस्थानात त्यांचीही भूमिका तपासण्यात येत आहे. परेश आणि पालेकर यांनी कुंडई येथे बोलावल्यावर पोलिस निरीक्षक गावडे हे पोलिस स्थानक सोडून तेथे गेल्याने त्यांच्याभोवतीही या कट-कारस्थानाचे वारे घोंगावत आहे.

अन् गणेशने दिला नकार

अपघात झालेल्या रात्री परेशने त्याचा कारचालक गणेश लमाणी याला बोलावून तो कार चालवत होता, असे पोलिसांना सांगण्यास सांगितले होते. गेली 15 वर्षे तो चालक म्हणून काम करत असल्याने तसेच त्याला आमिष दाखवल्याने तो हा गुन्हा स्वतःवर घेण्यास तयार झाला.

मात्र त्याला या अपघातात तिघांचा मृत्यू तसेच काहीजण जखमी झाल्याचे माहीत नव्हते. पोलिसांनी त्याला म्हार्दोळ पोलिस स्थानकात आणले आणि वस्तुस्थिती सांगून कोणती शिक्षा होऊ शकते, याची माहिती दिल्यावर त्याने गुन्हा स्वतःवर घेण्यास नकार दिला.

दोघांवर गुन्हा नोंद; कॉन्स्टेबलला अटक

28 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिला आणि तिच्या पतीला शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी प्रमुख संशयित पोलिस कॉन्स्टेबल (आयआरबी) सूरज सक्सेना (रा. चिंबल) याला अटक केली आहे.

ही घटना १ सप्टेंबर रोजी पोंबुर्फा येथे घडली. संशयित सूरजने तक्रारदार विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग केला. तसेच संशयिताने पीडित आणि तिच्या पतीला शिवीगाळ करून धमकी दिली.

पोलिसांनी संशयित आणि त्याच्या मित्रावर गुन्हा नोंदविला आहे. त्याचा मित्र बबित नाईक हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पिस्तुलामधूून गोळी सुटून उपनिरीक्षकाची पत्नी जखमी

कुतुहलापोटी सरकारी पिस्तूल न्याहाळताना अचानक गोळी सुटल्याने पोलिस उपनिरीक्षकाची (आयआरबी) पत्नी गंभीररित्या जखमी झाली. गौरी धनू भोगाटी (वय २४ वर्षे) असे तिचे नाव असून ही दुर्घटना मंगळवारी (ता.५) रात्री सर्वेवाडा, गिरी येथे घडली.

जखमी गौरी बोलण्याच्या स्थितीत नसल्याने अद्याप पोलिसांनी तिचा जबाब घेतलेला नाही. त्यामुळे घटनेवेळी नेमके काय झाले, हे समजू शकलेले नाही. त्यामुळे अद्याप याप्रकरणी कुठलाही गुन्हा नोंद झालेला नाही.

याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती धनू भोगाटी याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. सर्व्हिस पिस्तूल हातात घेऊन ते पाहात असताना पिस्तुलामधून अचानक गोळी सुटून पायात घुसली

विनयभंगाचा आरोप, तरीही उद्दामपणा कायम

गोवा विद्यापीठातील दोन इंटर्न विद्यार्थिनींच्या विनयभंगप्रकरणी अंतर्गत समितीमार्फत सुरू असलेल्या चौकशीवेळी पोलिस अधिकाऱ्याने उपस्थित राहून त्याने तक्रारदारांची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला आहे.

या अधिकाऱ्याने मी निष्पाप असून कोणताही गुन्हा किंवा गैरवर्तन केले नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात समिती या अधिकाऱ्यावर कोणत्या कारवाईची शिफारस करते, याकडे लक्ष लागले आहे.

वाणिज्य शाखेतील साहाय्यक प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार महिला पोलिस स्थानकात दाखल झाल्यानंतर गोवा विद्यापीठाच्या अंतर्गत समितीसमोर गेली अनेक महिने प्रलंबित असलेल्या दोन विद्यार्थिनींच्या विनयभंगप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीचा मुद्दाही समोर आला होता.

अंतर्गत समितीने काहीच पावले उचलली नसल्याने त्याविरोधात विद्यापीठ कुलसचिवांना विद्यार्थिनी संघटनांनी जाब विचारल्यानंतर ही समिती सक्रिय झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

SCROLL FOR NEXT