महासत्ता अमेरिकेवर 39 ट्रिलियन डॉलरचे कर्ज; करकपात, युद्धांवरील खर्चामुळे बोजा वाढला

US national debt 39 trillion : अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज बुधवारी ३९ ट्रिलियन डॉलर या विक्रमी टप्प्यापर्यंत पोहोचले आहे.
US national debt 39 trillion
US national debt 39 trillionDainik Gomantak
Published on
Updated on

US debt record high : अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज बुधवारी ३९ ट्रिलियन डॉलर या विक्रमी टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धानंतर कर्जाने हा टप्पा ओलांडला आहे. करविषयक कायदा मंजूर करणे, संरक्षण खर्चात झालेली वाढ यामुळे कर्जामध्ये वाढ होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीदरम्यान कर्ज कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत ते वाढत असल्याचे चित्र आहे.

सरकारच्या दायित्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या कर्जामुळे अमेरिकन नागरिकांना विविध कर्जांसाठी जास्त व्याजदर भरावे लागत असून, व्यवसायांकडे गुंतवणुकीसाठी कमी पैसा उपलब्ध राहत आहे. यामुळे वेतन कमी होऊ शकते आणि वस्तू व सेवांच्या किमती वाढतात.

US national debt 39 trillion
Goa Politics: '...मंत्रिमंडळ बरखास्त करा', अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळल्यानं विरोधक आक्रमक; राज्यपालांना निवेदन

पीटर जी. पीटरसन फाउंडेशनचे अध्यक्ष मायकेल पीटरसन यांनी म्हटले, ‘‘रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक अशा दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांच्या काळात कर्ज वाढले आहे. युद्धे, कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य सेवेवरील मोठा खर्च आणि करकपात यामुळे अलीकडच्या काळात कर्ज झपाट्याने वाढले.’’

पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रीय कर्ज ३८ ट्रिलियन डॉलर होते, तर त्याआधी दोन महिन्यांत ३७ ट्रिलियन डॉलर होते.’’ कोणतीही योजना नसताना कर्ज वाढत असणे म्हणजे अस्थिरता वाढत असल्यासारखे आहे, असेही पीटरसन यांनी म्हणाले.

US national debt 39 trillion
Goa Weather Update: वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण, पारा 34 अंशांवर; शनिवारी पावसाची शक्यता

युद्धासाठी १२ अब्ज डॉलर खर्च

‘व्हाइट हाउस’चे आर्थिक सल्लागार केविन हॅसेट यांनी सांगितले की, इराणविरुद्ध युद्धामुळे अमेरिकेचा आतापर्यंत १२ अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च झाला आहे. हे युद्ध कधी संपेल हे अद्याप स्पष्ट असल्यामुळे कर्ज वाढत जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com