Railway Police: रेल्वेत चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; तब्बल 'एवढ्या' रकमेचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी मुंबईतून 03 आरोपींना अटक केलीय
theft
theft Dainik Gomantak

Railway Police: कोकण रेल्वेत चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. पीआय सुनील गुडलार यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे पोलिसांनी हि कारवाई केल्याची माहिती प्राप्त झालीय.

या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी मुंबईतून 03 आरोपींना अटक केलीय. मुंबई ते केरळ असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे सोने, मोबाईल असा एकूण 6,50,000/- रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी लंपास केला होता. ही सर्व मालमत्ता जप्त करण्यात कोकण रेल्वे पोलिसांना यश आलंय.

theft
State Level Football Tournament: 'वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक' राज्यस्तरीय विजेते

काही महिन्यांपूर्वी धावत्या कोकण रेल्वेत चोरी प्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी दोघांना सांगलीतून अटक केली होती. सोने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी यापूर्वी काही जणांना अटक केली होती.

सांगलीतून अटक करण्यात आलेल्या दोघांकडून एक कार आणि दोन मोबाईल जप्त केले होते. रेल्वे मध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून कोकण रेल्वे पोलीस अशा घटनांना आवर घालण्यासाठी प्रयत्नशील आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com