Porvorim News: पर्वरीत त्सुनामीचा सायरन, केंद्रीय यंत्रणांनी दिले स्पष्टीकरण

पर्वरीत त्सुनामी आल्याचा सायरन वाजला आणि लोकांमध्ये एकच घबराट पसरली.
Porvorim News
Porvorim NewsDainik Gomantak

Porvorim News वेळ रात्रीची. ठिकाण राजधानी पणजी नजीकच पर्वरी शहर. शहरातील Early Warning Dissemination System म्हणजेच पूर्व चेतावणी प्रसार प्रणाली टॉवरवर त्सुनामी आल्याचा सायरन वाजला आणि लोकांमध्ये एकच घबराट पसरली.

क्षणभरासाठी नक्की कुठे काय घडतंय याचा कुणालाच अंदाज येत नव्हता. सरकारी यंत्रणेकडून त्सुनामीआल्याचा संदेश मिळताच स्थानिक प्रसारमाध्यमांनी समुद्रात त्सुनामी आल्याच्या बातम्या प्रसारित करायला सुरुवात केली. पण नंतर या मागचं सत्य समोर आलं.

Indian National Center for Ocean Information Services कडून याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. सिस्टीममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने 'त्सुनामी आल्याचा सायरन अचानक वाजू लागल्याचे' सांगण्यात आलं.

Porvorim News
Railway Police: रेल्वेत चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; तब्बल 'एवढ्या' रकमेचा मुद्देमाल हस्तगत

तेथील कर्मचाऱ्यांनी हा सायरन बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आवाज थांबवणं शक्य नव्हतं.

अखेर हा सायरन बंद झाला आणि संबंधित विभागाकडून त्सुनामी सारखी कोणतीही घटना घडली नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com