IFL 2026: धेंपो क्लबला पहिल्या विजयाची प्रतीक्षा, तीन लढतीतून दोन गुण; गोकुळम केरळाविरुद्ध आज सामना

Dempo SC vs Gokulam Kerala IFL 2026: इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) स्पर्धेतील तीन सामन्यांतून फक्त दोन गुणांची कमाई केलेल्या धेंपो स्पोर्टस क्लबला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
 IFL 2026
IFL 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) स्पर्धेतील तीन सामन्यांतून फक्त दोन गुणांची कमाई केलेल्या धेंपो स्पोर्टस क्लबला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. स्पर्धेत ते शुक्रवारी केरळमधील पय्यनाड येथे गोकुळम केरळाविरुद्ध खेळतील.

धेंपो क्लबप्रमाणे गोकुळम केरळाचेही तीन सामन्यांतून दोन गुण असून दोन बरोबरी व एक पराभव अशी समान कामगिरी आहे. धेंपो क्लबने पाच गोल केले असून गोकुळम केरळाने फक्त एक गोल केला आहे. गोल नोंदविण्यात सरस असल्यामुळे गोव्यातील संघ वरच्या क्रमांकावर, तर केरळमधील संघ तळाच्या दहाव्या क्रमांकावर आहे.

 IFL 2026
Goa Weather Update: वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण, पारा 34 अंशांवर; शनिवारी पावसाची शक्यता

सामन्याच्या पूर्वसंध्येला ऑनलाईन पत्रकार परिषदेत धेंपो क्लबचे प्रशिक्षक समीर नाईक यांनी सांगितले, की आमची कामगिरी समाधानकारक असली, तरी काही निकाल आमच्यासाठी अपेक्षापूर्ती करणारे ठरले नाहीत. स्पर्धेतील प्रत्येक संघ परिश्रम घेत आहे. त्यामुळे कोणत्याही संघाची वाटचाल सोपी नाही. तळातील संघही विजयासाठी प्रयत्नशील आहे. साहजिकच आमच्यासाठी गोकुळम केरळाविरुद्धचा सामना सोपा नसेल.

धेंपो क्लबने स्पर्धेत केलेले पाचही गोल परदेशी खेळाडूंनी नोंदविले आहेत. यामध्ये त्रिनिदाद-टोबॅगोचा आघाडीपटू मार्कुस जोसेफ याने तीन, तर आयव्हरी कोस्टचा ऑबिन कौआकौऊ व कोलंबियन सेबॅस्टियन गुटिएरेझ यांनी प्रत्येकी एक गोल केला आहे.

 IFL 2026
Goa Tourism: गोव्यातला 'स्वर्ग...'! शॉपिंग, बीच शॅक्स अन् अथांग सागराचं लावण्य अनुभवायचयं; 'हा' समुद्रकिनारा तुमच्यासाठी बेस्ट

संघांची स्पर्धेतील कामगिरी

धेंपो स्पोर्टस क्लबची रियल काश्मीर व चानमारी एफसीविरुद्ध २-२ अशी गोलबरोबरी, तर डायमंड हार्बर क्लबविरुद्ध १-२ असा पराभव

गोकुळम केरळाची चानमारी एफसीवरुद्ध गोलशून्य, तर नामधारी संघाविरुद्ध १-१ बरोबरी, श्रीनिदी डेक्कनविरुद्ध ०-१ असा पराभव

गतमोसमात आमने-सामने

१४ जानेवारी २०२५ रोजी गोव्यात गोकुळम केरळाचा १-० असा निसटता विजय

६ एप्रिल २०२५ रोजी केरळमध्ये धेंपो

क्लबची ४-३ अशी विजयी बाजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com