Drugs Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: ड्रग्स तस्करीत महिलांचा सुळसुळाट! क्राईम ब्रँचच्या छाप्यात 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

Guirim Drugs Case: झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाने परप्रांतीय महिला ड्रग्स माफियांबरोबर काम करत असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Drugs Case Goa

पणजी: मूळच्या छत्तीसगडच्या व सध्या गिरी येथे भाडेपट्टीवर राहत असलेल्या आशा अजय लक्रा या ४० वर्षीय महिलेच्या खोलीवर क्राईम ब्रँचच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत तिच्या पर्समधून सुमारे २४० एमडीएमए व एक्स्टसीच्या गोळ्या व खोलीतून मोबाईल फोन जप्त केला आहे. या ड्रग्सची किंमत सुमारे ६ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

राज्यात ड्रग्स व्यवसाय किनारपट्टी परिसरात पुरुषांसह आता महिलाही या व्यवसायात गुंतल्या आहेत. झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाने परप्रांतीय महिला ड्रग्स माफियांबरोबर काम करत असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी किनारपट्टीवरील संशयास्पद फिरणाऱ्या व ड्रग्स माफियांशी संबंध असलेल्या महिलांवर पाळत ठेवली होती. काल संध्याकाळी एका महिलेला पोलिसांनी हेरून तिला ताब्यात घेतले व तिच्या उपस्थितीत गिरी येथील तिच्या घरी तपासणी केली असता त्रिकोणी व अंडाकृती आकाराच्या एमडीएमए व एक्सटीच्या गोळ्या सापडल्या होत्या.

या गोळ्यांचे वजन सुमारे ११८.५३७ ग्रॅम आहे. तिने त्या गोळ्या आपल्या पर्समध्ये दोन वेगवेगळ्या पॉलिथिन पिशवीमध्ये ठेवल्या होत्या. ड्रग्स बाळगल्याप्रकरणी तिला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर करत आहेत.

छत्तीसगडमधील तरुणीला अटक

किनारी भागात ड्रग्स माफिया व विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. ही साखळी मोठी असून ती आता हॉटेल कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या पर्यटकांना त्यांना हवा तो ड्रग्स काही हॉटेलात कामाला असलेले कर्मचारी उपलब्ध करत आहेत. त्यामुळे ड्रग्स माफियांनाही या ड्रग्स व्यवसाय वाढविला आहे मात्र त्यापुढे पोलिस यंत्रणा ड्रग्स विक्री नियंत्रणात आणण्यासाठी कमकुवत पडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Madhav Gadgil: खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही? गोव्यावर भरभरून प्रेम करणारे 'माधव गाडगीळ'

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

SCROLL FOR NEXT