Drugs In Goa: पोलिसांना हुल देऊन गांजा गोव्‍यात आणला जात होता; वाटेत पोलिस दिसले की माल तिथेच सोडून पळून जाण्‍याच्‍या सूचना त्‍यांना देण्‍यात येत होत्‍या
Goa Drug CaseDainik Gomantak

Goa Drugs Case: अक्षयकुमारला ओडिशात अटक; ड्रग्‍जडिलिंग प्रकरणी पाच दिवसांची कोठडी

Drugs In Goa: पोलिसांना हुल देऊन गांजा गोव्‍यात आणला जात होता; वाटेत पोलिस दिसले की माल तिथेच सोडून पळून जाण्‍याच्‍या सूचना त्‍यांना देण्‍यात येत होत्‍या
Published on

Curchorem Drugs Case

मडगाव: कुडचडे पोलिसांनी काल ओडिशातून अटक करून आणलेल्‍या अक्षयकुमार बिस्‍वाल या ड्रग डिलरकडून यापूर्वीही गोव्‍यात गांजाचा साठा पाठविण्‍यात आला होता अशी माहिती पोलिसांच्‍या हाती लागली आहे. यापूर्वी त्‍याने गोव्‍यात कधी अंमलीपदार्थ पाठविले होते, याची चौकशी सध्‍या सुरू आहे. काल संशयिताला केपे न्‍यायालयासमोर हजर केले असता त्‍याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली.

कुडचडे पोलिसांनी ६ सप्‍टेंबर रोजी कुडचडे रेल्‍वेस्‍थानकाजवळ साडेआठ किलो गांजा पकडला होता. त्‍यावेळी एका ओडिशाच्‍या युवकाला अटक केली होती. या युवकाने आपल्‍याला अक्षयकुमारने गांजा घेऊन गोव्‍यात पाठविले होते अशी जबानी पोलिसांना दिली होती. यावरून कुडचडे पोलिस ओडिशातून ड्रग्‍स डिलिंग करणाऱ्या अक्षयकुमारपर्यंत पोहोचले. ओडिशातील भद्रक या जिल्‍ह्यातून त्‍याला अटक करण्‍यात आली.

कामासाठी बेकार युवकांची निवड

ओडिशातील काही बेकार युवकांना हुडकून त्‍यांच्‍यामार्फत हा गांजा गोव्‍यात पाठविण्‍यात येत होता. रेल्‍वेतूनच हा अंमलीपदार्थ गोव्‍यात यायचा. यापूर्वी कुडचडे पोलिस स्‍थानकावर पोलिसांना बेवारस स्‍थितीत तीन लाख रुपयांचा गांजा सापडला होता. तसेच त्‍यापूर्वी मडगावच्‍या रेल्‍वेस्‍थानकावरही अशाच मोठ्या प्रमाणावर बेवारस स्‍थितीत गांजाचा साठा सापडला होता.

Drugs In Goa: पोलिसांना हुल देऊन गांजा गोव्‍यात आणला जात होता; वाटेत पोलिस दिसले की माल तिथेच सोडून पळून जाण्‍याच्‍या सूचना त्‍यांना देण्‍यात येत होत्‍या
Goa Drugs Case: नायजेरियन नागरिकाला न्यायालयाचा दणका! ड्रग्जतस्करी प्रकरणात जामीन फेटाळला

‘पोलिस दिसले की गांजा टाकून पळून जा’

पोलिसांना हुल देऊन गांजा गोव्‍यात आणला जात होता. वाटेत पोलिस दिसले की माल तिथेच सोडून पळून जाण्‍याच्‍या सूचना त्‍यांना देण्‍यात येत होत्‍या. कुडचडे व मडगाव रेल्‍वेस्‍थानकावर जो बेवारस स्‍थितीत गांजा सापडला होता, तो अशाच प्रकारे पाठविलेल्‍या युवकांकडून सोडून देण्‍यात आला होता अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com