Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कोलवाळ येथे दुचाकीवरून चाललेल्या 'कपल'ला तिघांची जबर मारहाण; कार आडवी घालून अडवले...

क्षुल्लक कारणावरून प्रकार; तिघेही आरोपी फरार

Akshay Nirmale

Goa Crime: कोलवाळ येथे दुचाकीवरून चाललेल्या एका तरूण कपलला तिघा जणांनी दमदाटी करत जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाण करणारे तिघेही आरोपी सध्या फरार आहेत.

या बाबत कोलवाळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तिन्ही फरारी आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, या मारहाणीत हे तरूण दाम्पत्य जखमी झाले आहे. म्हापसा जिल्हा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत मारहाण झालेल्या पीडीत युवतीने तक्रार दिली. त्यावरून पंकज सडेकर, पंकज साळगावकर व देवेंद्र तेमकर (सर्व रा. कोलवाळ) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

रोडरेजवरून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मारहाण झालेली युवती म्हापशात काम करते. तर तिचा मित्र सरकारी कर्मचारी तो पणजीत असतो. हे दोघेही पीर्ण येथील रहिवासी आहेत.

कामावरून हे दोघेही घरी जात होते. श्रीराम मंदिरासमोर शनिवारी संध्याकाळी सव्वासातत्या सुमारास ही घटना घडली आहे. संशयितांनी स्वतःची कार रस्त्यावर या दुचाकीस्वार तरूण दाम्पत्याच्या पुढे नेऊन आडवी लावली.

त्यामुळे त्यांना दुचाकी थांबवावी लागली. त्यावेळी बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर शिवीगाळ करत तिघांनीही दाम्पत्याला मारहाण केली आणि तिथून पसार झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT