Goa Night Life: देशाची पार्टी कॅपिटल असलेल्या गोव्यात नाईट लाईफच्या 'या' 4 गोष्टी करू नका मिस्स...

पाळोलेच्या शांत किनाऱ्यापासून ते मांडवीतील हाय ऑक्टेन क्रुझ पार्टीपर्यंत
Goa Night Life:
Goa Night Life: Dainik Gomantak

Goa Night Life: : गोवा म्हटले की तोंडी एकच शब्द येतो तो म्हणजे एन्जॉय. गोव्याबाहेर देशातील इतर राज्यात गोव्याची पर्यटनाच्या अनुषंगाने अशीच ओळख बनली आहे.

त्यामुळेच गोवा म्हणजे गोव्याची पार्टी कॅपिटल आहे, असेही म्हटले जाते. तर या पार्टी कॅपिटलमधील नाईटलाईफच्या ज्या गोष्टी पर्यटकांनी मिस करू नयेत, असे वाटते, त्या विषयी जाणून घेऊया...

गोव्याकडे येणारे पर्यटक समुद्रकिना-यावरील बोनफायरपासून ते लेट नाईट पार्ट्यांपर्यंत नवीन वर्ष नाचत-गात साजरे करत असतात. आताही नवीन वर्ष जवळ येऊ लागल्याने गोवा सज्ज झाला आहे.

Goa Night Life:
Goa Bench: म्हापशातील 20 बेकायदा होर्डिंगची वीज तोडण्याचे गोवा खंडपीठाचे आदेश

पाळोले बीचफ्रंट एक्स्ट्राव्हॅगान्झा

काणकोण येथील पाळोले बीचवर या इव्हेंटचे आयोजन केले जाते. बीचवरील वाळू आणि सौम्य लाटांसह नवीन वर्षाच्या संध्याकाळचा उत्सव येथे दरवर्षी टीपेला पोहचतो. या बीचवर समुद्राच्या लाटांच्या आवाजासह ताऱ्यांखाली नाचण्याचा आनंद घेता येतो.

याशिवाय येथील बीच क्लब आणि शॅक्स इलेक्ट्रिक म्युझिक, चकाकणारे दिवे आणि निखळ आनंदाचे वातावरण पर्यटकांमध्ये जोष भरणारे असते. पाळोले समुद्रकिनाऱ्यावरील ही नाईटलाईफ अनुभवण्यासारखी असते.

हणजुणे येथील सायलेंट पार्टी

Anjuna Beach येथे सायलेंट पार्टीचे एक आकर्षण असते. यात तुम्हाला एक हेडफोनची जोडी दिली जाते. आणि तुमच्या पसंतीचे डिजे चॅनेल निवडून तुम्हाला त्यावर डान्स करता येतो. यामुळे ध्वनी प्रदूषणाचा दुसऱ्याला त्रास होत नाही.

आणि तुम्हाला स्वतःला मात्र मस्त डान्स करत एन्जॉय करता येऊ शकते. हणजुणे किनाऱ्यावरील या पार्टीमुळे वातावरण जिवंत होते. विविध तालांवर चालणारा हा मूक उत्सव देखील पाहण्यासारखा असतो.

Goa Night Life:
Gogoro Electric Scooters ने दिल्ली आणि गोव्यात उघडले बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क

नवीन वर्षात समुद्रपर्यटन

मांडवी नदीकाठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला समुद्रपर्यटन करणे हा देखील एक रोमँटिक आणि ट्राय करण्यासारखा पर्याय आहे. अनेक क्रुझ ऑपरेटर लाइव्ह म्युझिक, डान्स फ्लोअर्स आणि स्वादिष्ट पाककृतीसह पूर्ण थीम असलेली क्रूझ ऑफर करतात. नवीन वर्षाच्या संस्मरणीय सुरुवातीसाठी हे ट्राय करायला हरकत नाही.

शॉपिंग

गोव्यात हडपडे येथे शनिवारी रात्री फ्ली मार्केटमध्ये खरेदी करण्याचा आनंदही घेता येतो. शनिवारी संध्याकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत हे फ्ली मार्केट सुरू अशते. येथील स्थानिक बारमधील काही कॉकटेल्सही ट्राय करता येऊ शकतात.

अशा प्रकारे पाळोलेचा शांत समुद्रकिनारा ते क्रूझमधील हाय ऑक्टेन पार्टी असे विविध पर्याय गोव्याच्या नाईटलाईफमध्ये उपलब्ध आहेत. जे एकदा तरी अनुभवले पाहिजेत, असेच आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com