Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बायणात महिलेचा गळा चिरून खून, कारण अस्‍पष्‍ट; घटनेनंतर खुनी तेथेच बसला होता आरामात

Baina Vasco murder case: महिलेचा चाकूने गळा चिरून खून करण्‍याची घटना घडल्‍याने आल्‍याने खळबळ माजली आहे.

Sameer Amunekar

वास्को: बायणा-वास्को येथील ‘नायक’ इमारतीत तिसऱ्या मजल्‍यावर राहणाऱ्या मेहरुनिसा बिडीकर (६४) या ज्‍येष्‍ठ महिलेचा चाकूने गळा चिरून खून करण्‍याची घटना घडल्‍याने आल्‍याने खळबळ माजली आहे. इमारतीच्‍या टेरेसवर जाऊन जोरजोरात दरवाजा ठोठावला म्‍हणून जाब विचारल्‍याच्‍या रागातून संशयिताने हे कृत्‍य केल्‍याचा अंदाज आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, आज रविवारी दुपारी २१ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. ‘नायक’ ही इमारत जीर्ण झाल्याने त्‍यात काही मोजकेच लोक विविध फ्लॅटमध्ये राहतात. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मेहरुनिसा व त्‍यांचा मुलगा मोहम्मद हे दोघे राहतात. मोहम्मद सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर गेला होता.

त्यानंतर थोड्या वेळाने त्याला त्या इमारतीतील एका व्यक्तीने फोन करून ‘तुझ्या आईला कोणीतरी मारण्यासाठी आले आहे’ असे सांगितले. तो आपल्या फ्लॅटमध्ये पोहोचला असता, त्याला त्याची आई रक्ताच्‍या थारोळ्यात पडलेली दिसली. विशेष म्‍हणजे संशयित खुनी दुसऱ्या खोलीत दार बंद करून बसला होता. तर, खून करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू तेथेच पडला होता.

या प्रकरणी मुरगाव पोलिसांना माहिती मिळताच त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन संशयित रोहम अली (२१, आसाम) याला ताब्यात घेतले. आरोपी मनोरुग्ण आहे की खुनाच्या घटनेवेळी दारूच्या नशेत होता, चोरीच्‍या उद्देशाने त्‍याने हे कृत्‍य केले का, की आणखी काय कारण आहे, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makharotsav Navratri in Goa: गोव्यातील मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवात साजरा होणारा 'मखरोत्सव', भक्ती आणि परंपरेचा भव्य संगम

Goa Live Updates: आजपासून जीएसटीचे नवे दर लागू

Navratri Horoscope: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची कृपा 'या' राशींवर, नशीब चमकेल आणि अडकलेली कामं मार्गी लागतील

Goa Road Issue: 'तक्रार द्या, 24 तासांत खड्डे बुजवू' मंत्री दिगंबर कामतांचं आश्वासन

Bicholim: कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला, तर खबरदार..! मुख्यमंत्र्यांनी दिला सज्जड इशारा

SCROLL FOR NEXT