Goa Beach: ...गोवावाले बीचपे! किनारे सजायला सुरुवात; व्यावसायिकांची लगबग सुरू

Goa Tourism: सरकार एका बाजूने पर्यटनाचा व्याप वाढवण्यासाठी प्रयत्नशील असले तरी पार्किंग, चेंजिंग रूम, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव अजूनही कायम आहे.
Goa Tourism Report
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्‍‍वे, मांद्रे, हरमल आणि केरी या समुद्रकिनारी पर्यटन हंगाम ऑक्टोबरपासून एप्रिलपर्यंत चालतो. याची चाहूल लागताच व्यावसायिकांनी किनारी भागात आपापल्या व्यवसायाची लगबग सुरू केली आहे.

सरकार एका बाजूने पर्यटनाचा व्याप वाढवण्यासाठी प्रयत्नशील असले तरी पार्किंग, चेंजिंग रूम, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव अजूनही कायम आहे. किनाऱ्यावर शेकडो लहान-मोठे व्यावसायिक असल्यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळतो.

सरकारी नोकरीला वयोमर्यादा असली तरी या व्यावसायिक उपक्रमांत कोणत्याही वयाला अडथळा नसतो. परंतु बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांची संख्‍याही भरमसाठ वाढली आहे. त्‍याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

रिसॉर्ट व्यावसायिकांची नवी योजना पर्यटकांना आकर्षित करणारी ठरणार आहे. पर्यटन हंगाम म्हटला की धामधूम आलीच.

किनारी भागातील काही रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आता पर्यटकांसाठी लग्नसोहळ्यांचे आयोजन करून व्यवसायाला नवा आयाम देत आहेत. मोरजीतील मोंन्टे बो, आश्वेतील ला कबाना, मांद्रेतल्या रिवा रिसॉर्टमध्ये विदेशी व देशी पर्यटकांसाठी खास लग्नसोहळे आयोजित होतात. संध्याकाळी सूर्यास्तानंतर रोषणाई, रंगमंच सजावट, भारतीय संगीताच्या मैफली अशा पार्श्वभूमीवर हे सोहळे गाजतात.

Goa Tourism Report
Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

पर्यटन हंगामातील वास्तव

महसूल वाढतो, पण सोयीसुविधा अपुऱ्या

चोऱ्या, विनयभंग, ध्वनिप्रदूषणाचे प्रकार वाढते

सरकारची आश्‍‍वासने कागदावरच मर्यादित

बेकायदेशीर व्यावसायिकांकडे डोळेझाक

Goa Tourism Report
Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

पर्यटकांसाठी आकर्षण, रोजगाराच्‍या संधी

लग्नसोहळ्यांची रंगतदार मेजवानी

संगीताच्या मैफली, रोषणाई सजावट

२०० पेक्षा कामगारांना रोजगाराच्या संधी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com