Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

सांतइस्तेवच्या खून प्रकरणातील 'लाकडी दांडा' पोलिसांच्या ताब्यात..

दैनिक गोमन्तक

फोंडा : (Goa Crime) सांतइस्तेव्ह येथे जबर मारहाण केल्याने मृत्यू पावलेल्या हरिंदर प्रसाद याला लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे स्पष्ट झाले असून फोंडा (Ponda) पोलिसांनी खुनासाठी वापरण्यात आलेला लाकडी दांडा ताब्यात घेतला आहे. हा खुनाचा प्रकार गेल्या शनिवारी रात्री घडला होता व रविवारी सकाळी उघडकीस आला होता.

या खूनप्रकरणी सांतइस्तेव्ह येथील कॅब्रिना रॉड्रिगीस, रुलाशा फर्नांडिस व सुनील मडकईकर असे त्रिकूट पोलिस कोठडीत असून त्यांना सात दिवसांचा रिमांड देण्यात आला आहे. मयत हरिंदर प्रसाद याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली असून त्याच्या डोक्यावर जबर वार झाल्याने त्याच्या मेंदुला इजा झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. डोक्याबरोबरच शरीराच्या इतर भागांवरही या दांड्याने वार केल्याने हरिंदर प्रसाद अर्धमेला झाला होता.

हरिंदर प्रसाद हा अर्धमेला झाल्याने त्याची कोणतीच हालचाल दिसत नसल्याने कॅब्रिना, रुलाशा तसेच सुनील या त्रिकुटाने हरिंदरला दुचाकीवर बसवून खांडोळा - सांतइस्तेव्ह पुलावरून खाली फेकले होते.

हरिंदर हा मूळ बिहारचा असून तो अमयावाडा - खांडोळा येथे राहत होता. कॅब्रिनाशी त्याची मैत्री होती. त्यामुळे कॅब्रिनानेच त्याला सांतइस्तेव्ह येथे आपल्या घरी बोलावले होते, तेथेच वाद झाल्याने या तिघांनीही हरिंदरला बेदम मारहाण केली होती, ज्यात तो मरण पावला होता. पोलिस याप्रकरणी अधिक पुरावे व साक्षीदार गोळा करीत असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, वेश्‍यागिरीतूनच हे प्रकरण घडले असल्याचा दावा येथील नागरिकांकडून केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

Goa Today's News Live: मायलेकीवर लैंगिक अत्याचार, असोल्डा येथील एकास अटक

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

गोव्यात Beach Wedding महागलं? दिवसाला मोजावे लागणारे तब्बल 'एवढे' रुपये, Price Details

SCROLL FOR NEXT