‘नो वॉटर, नो व्‍होट’ बादें-आसगावातील महिलांचा निर्धार

सरकारने सर्वप्रथम गावागावांतील पाणी समस्या सोडवून दाखवावी
Goa Water Problem
Goa Water Problem Dainik Gomantak

शिवोली : स्‍वयंपूर्ण गोवा करण्याची पोकळ घोषणाबाजी करीत सरकार विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत आहे. सरकारने सर्वप्रथम गावागावांतील पाणी समस्या (Goa Water Problem) सोडवून दाखवावी. बादें -आसगाव येथील महिला गेली अनेक वर्षे पाण्यासाठी वणवण करीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत या भागातील पाण्याची समस्या कायम स्वरूपात सुटणार नाही, तोपर्यंत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय बादें आसगावातील महिलांनी घेतला.

Goa Water Problem
खाणपट्ट्यातील युवकांना हवा रोजगार

मंगळवारी संध्याकाळी मोठ्या संख्येने या भागातील मुख्य रस्त्यावर उतरलेल्या महिलांनी ‘नो वॉटर, नो व्‍होट’ अशा जोरदार घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. यावेळी त्यांच्या डोक्यावर रिकाम्या कळशा, तसेच हाती रिकाम्‍या बादल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून बादे-आसगावात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या ग्रामस्थांना सतावत आहे. रात्री -बेरात्री कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्‍थांची तारांबळ उडते व झोपमोडही होते.

आपण पाणीसमस्‍येप्रश्‍‍नी गेले वर्षभर संबंधित खात्याशी रितसर पत्रव्यवहार केला आहे. मात्र, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत आजवर कुणीच लक्ष दिले नाही. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार नाही, तोपर्यंत आगामी विधानसभा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार घातला जाईल.

Goa Water Problem
मुरगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळीवर विरजण

- क्षीरसागर नाईक, पंचायत सदस्‍य.

बादें-आसगाव, कायसूवमधील सुमारे तीन हजार लोकांना पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील समस्येने पूर्णत: ग्रासले आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा खात्याच्या म्हापसा येथील कार्यालयाला निवेदन सादर करून सात दिवसांची मुदत त्यांना दिली आहे. नाहीतर पाणीपुरवठा कार्यालयावर महिलांचा मोर्चा आणला जाईल.

-पार्वती नागवेकर, काँग्रेस समिती गट अध्यक्ष

जोरदार घोषणाबाजी : पाणी समस्‍येने त्रस्‍त झालेल्‍या महिलांनी हाती रिकाम्या घागर तसेच बादल्या घेऊन निषेध नोंदवला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्‍यांच्‍या हातात निषेधफलकही होते. ग्रामस्‍थही रस्‍त्‍यावर उतरून निषेध नोंदवत होते. यावेळी स्थानिक महिला आश्विनी सावंत, नम्रता नार्वेकर, अंकीता नाईक तसेच जग्गनाथ गावकर, सारंग यांनी पत्रकारांसमोर व्‍यथा मांडल्‍या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com