Dulip Karandak Cricket Tournament Dainik Gomantak
गोवा

Dulip Karandak: एकनाथ, लक्षय दक्षिण विभाग संघात

गोव्याच्या दोघा खेळाडूंना दीर्घ कालावधीनंतर संधी

दैनिक गोमन्तक

पणजी: यष्टिरक्षक-फलंदाज एकनाथ केरकर आणि वेगवान गोलंदाज लक्षय गर्ग या गोव्याच्या क्रिकेटपटूंची आगामी दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय संघात निवड झाली. केरळमधील कोची येथे शुक्रवारी निवड समितीची बैठक झाली. त्यावेळी 15 सदस्यीय संघावर शिक्कामोर्तब झाले.

(Goa cricketers Eknath Kerkar and Lakshay Garg selected in South Division team for Dulip Karandak Cricket Tournament)

दक्षिण विभागीय संघ निवड समिती बैठकीत गिरीश पारेश यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व केले. चार दिवसीय सामन्यांची दुलिप करंडक स्पर्धा 8 सप्टेंबरपासून तमिळनाडूत खेळली जाईल. या स्पर्धेत मध्य विभाग आणि दक्षिण विभागास थेट उपांत्य फेरीत चाल देण्यात आली आहे. त्यांचे सामने 15 सप्टेंबरपासून खेळले जातील. कसोटीपटू हनुमा विहारी दक्षिण विभाग संघाचा कर्णधार, तर मयांक अगरवाल उपकर्णधार आहे.

गतमोसमात लक्षवेधक कामगिरी

मुंबईतर्फे क्रिकेटची सुरवात केलेला एकनाथ यंदा गोव्याचे तिसऱ्या मोसमात प्रतिनिधित्व करेल. गतमोसमात या 28 वर्षीय खेळाडूने गोव्यातर्फे तीन रणजी सामन्यांत चार अर्धशतकांच्या मदतीने 56 च्या सरासरीने 280 धावा केल्या, तसेच यष्टीमागे 12 झेलही पकडले. 26 वर्षीय लक्षयने तीन रणजी सामन्यांत 23.33 सरासरीने 12 गडी बाद केले. मुंबईविरुद्ध अहमदाबाद येथे त्याने जबरदस्त मारा करताना पहिल्या डावात 46 धावांत 6 गडी बाद केले होते. एकंदरीत लक्षयने गोव्यातर्फे रणजी स्पर्धेत 21 सामन्यांतून 73 गडी बाद केले आहेत.

यापूर्वी दुलिप स्पर्धेत गोव्याचे चौघे

स्वप्नील अस्नोडकर, शदाब जकाती, सौरभ बांदेकर, सगुण कामत यांची दुलिप करंडक स्पर्धेसाठी निवड झाली होती. स्वप्नील 2005 व 2008 मध्ये मिळून एकूण चार सामने खेळला. त्याने दुलिप करंडक स्पर्धेत एक अर्धशतकही नोंदविले आहे. मार्च 2005 मध्ये स्वप्नीलने उत्तर विभागाविरुद्ध 74 धावांची खेळी केली होती.

डावखुरा फिरकी गोलंदाज शदाब जकाती 2008-09 व 2009-10 मोसमात मिळून दोन दुलिप करंडक सामने खेळला, तर वेगवान गोलंदाज सौरभ बांदेकरने 2008-09 मोसमातील एका सामन्यात दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. 2017 मध्ये सगुणची दुलिप करंडक स्पर्धेसाठी इंडिया ब्ल्यू संघात निवड झाली होती.

दक्षिण विभाग संघ: हनुमा विहारी (कर्णधार, हैदराबाद), मयांक अगरवाल (उपकर्णधार, कर्नाटक), रोहन कुन्नुम्मल (केरळ), मनीष पांडे (कर्नाटक), देवदत्त पडिकल (कर्नाटक), बाबा इंदरजित (तमिळनाडू), एकनाथ केरकर (यष्टिरक्षक, गोवा), रिकी भुई (यष्टिरक्षक, आंध्र), साई किशोर (तमिळनाडू), के. गौतम (कर्नाटक), बासिल थंपी (केरळ), रवी तेजा (हैदराबाद), व्ही. सी. स्टीफन ( आंध्र), तनय त्यागराजन (हैदराबाद), लक्षय गर्ग (गोवा). राखीव खेळाडू ः के. व्ही. सिद्धार्थ, सचिन बेबी, शाहरुख खान, एस. पी. उदेशी, तन्मय अगरवाल.

दक्षिण विभाग संघात निवड झालेल्या लक्षय गर्ग आणि एकनाथ केरकर यांची अभिनंदन आणि संघटनेतर्फे त्यांना सुयश चिंतितो. एकावेळी गोव्याच्या दोघा क्रिकेटपटूंची निवड ही गोवा क्रिकेट असोसिएशनसाठी मोठी उपलब्धी आहे. पुढील वेळी दक्षिण विभाग संघात गोव्याचे चार खेळाडू असतील हे उद्दिष्ट्य असेल. त्यासाठी आगामी मोसमात गोव्याच्या क्रिकेटपटूंना मेहनत घेत सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.- विपुल फडके,सचिव गोवा क्रिकेट संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT