Smriti Mandhana
Smriti MandhanaDainik Gomantak

Team India: ICC ने दिले Smriti Mandhana ला खास गिफ्ट, या दिग्गजांच्या लिस्टमध्ये एन्ट्री

Smriti Mandhana: भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना तिच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जाते.

Smriti Mandhana: भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना तिच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जाते. स्मृती मानधना सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. दरम्यान, स्मृतीला एक मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) तिचा खास लिस्टमध्ये समावेश केला आहे.

स्मृती मानधना या खास क्लबमध्ये सामील झाली

भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि युवा सलामीवीर शफाली वर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत समावेश केला आहे. शफाली वर्मा, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन, न्यूझीलंडची (New Zealand) अमेलिया केर, वेस्ट इंडिजची (West Indies) हेली मॅथ्यूज आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड या '100 पर्सेंट क्रिकेट सुपरस्टार्स' क्लबच्या महिला खेळाडू बनल्या आहेत.

Smriti Mandhana
Smriti Mandhana: मराठमोळी क्रिकेटर स्मृती मानधनाचा स्टायलिश अंदाज

100 पर्सेंट क्रिकेट सुपरस्टार्स

शुक्रवारी, ICC ने '100 पर्सेंट क्रिकेट सुपरस्टार्स' क्लबमध्ये आणखी पाच खेळाडूंचा समावेश केला - मानधना, फातिमा सना (पाकिस्तान), ऍशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), सोफिया डंकले (इंग्लंड) आणि गॅबी लुईस (आयर). 26 वर्षीय मानधना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दशक पूर्ण करण्याच्या जवळ आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट तिने स्वतःला सिध्द केले आहे.

Smriti Mandhana
Team India चे जानेवारी 2023 पर्यंतचे पॉवरपॅक वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आतापर्यंतची आकडेवारी

भारतीय महिला क्रिकेटमध्येही मानधना कर्णधार म्हणून उदयास आली आहे. सातत्यापूर्ण खेळीमुळे तिला 2021 मध्ये ICC वुमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर चा किताब देण्यात आला होता. तर ICC वुमेन्स खेळाडूंच्या क्रमवारीत ती ODI आणि T20 मध्ये फलंदाजांसाठी अनुक्रमे 10 व्या आणि 4 व्या स्थानावर आहे. मानधानाने 74 एकदिवसीय सामने खेळले असून 42.52 च्या सरासरीने 2,892 धावा केल्या आहेत, ज्यात पाच शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये तिने 92 सामन्यांमध्ये 2,192 धावा केल्या आहेत, ज्यात 16 अर्धशतकांचा समावेश आहे. स्मृतीने चार कसोटी सामने खेळले असून एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com