Court
Court  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी महत्त्वाच्या साक्षी नोंदविणे बाकी

दैनिक गोमन्तक

मडगाव: 22 वर्षांपूर्वी संपूर्ण गोवा हादरवून सोडलेल्या तिकीटविक्री घोटाळा प्रकरणाचा खटला पुढे चालविण्यास अभियोग पक्ष काहीच हालचाल करीत नाही, हे पाहून मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कार्लो सिल्वा यांनी या प्रकरणातील साक्षी पुरावे नोंदवून घेण्याची प्रक्रिया बंद केली असली तरी अजून या प्रकरणात 25 ते 30 महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेणे आवश्यक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (Goa cricket match tickets sale scam)

या प्रकरणात ज्यांनी तपास केला त्या तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदविणे आवश्यक असून जी बनावट तिकिटे सापडली होती. त्यांची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत चाचणी केली होती. त्या तज्ज्ञांची साक्ष नोंदवून घेणे आवश्यक आहे.

या साक्षी झाल्या नाहीत तर खटला पूर्णपणे कोसळण्याची भीती आहे, अशी माहिती या प्रकरणाशी निगडित असलेल्या सूत्रांनी दिली. यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. 2001 साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात निर्णायक असा एकदिवसीय क्रिकेट सामना मडगावात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सामन्याच्या तिकिटांची मागणी भरमसाठ वाढल्याने मोठ्या प्रमाणावर बनावट तिकिटे बाजारात आणली गेल्याने स्टेडियमवर (Stadium) दुप्पट गर्दी उडाली होती. एकूण 60 लाखांची बनावट तिकिटे विक्रीला काढल्याचा आरोप करून माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यासह एकूण 11 संशयितांवर आरोपपत्र दाखल केले होते.

प्रदीर्घ काळ प्राथमिक अवस्थेतच रेगाळलेल्या या खटल्याच्या सुनावणीत शेवटी शेवटी सरकारी वकिलांनी न्यायालयात येणेही बंद केल्याने न्यायालयाने शेवटची ताकीद दिली होती. तरीही अभियोग पक्षाने उपाय न घेतल्याने शेवटी न्यायाधीशांनी (Judge) साक्षी पुरावे नोंदणे आटोपते घेतले होते. आता या प्रकरणी संशयिताचे जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया होणार असून त्यानंतर शेवटचा युक्तिवाद होऊन खटल्याचा निकाल लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT