Goa Cow Plastic Surgery Dainik Gomantak
गोवा

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Goa Cow Plastic Surgery: गोव्यातील नाणुस वाळपई येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात एक धक्कादायक आणि चिंतेची बाब समोर आली आहे.

Sameer Amunekar

वाळपई: गोव्यातील नाणुस वाळपई येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात एक धक्कादायक आणि चिंतेची बाब समोर आली आहे. या केंद्रात असलेल्या एका गायीच्या पोटात प्रचंड प्रमाणात प्लास्टिक जमा झाले होते. वेळीच निदान आणि योग्य उपचार झाल्यामुळे या गायीचे प्राण वाचले.

शस्त्रक्रियेद्वारे या गायीच्या पोटातून तब्बल 25 किलो 800 ग्राम प्लास्टिक बाहेर काढण्यात आले. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्यात आली. या कार्यामध्ये पशुवैद्यकीय डॉ. सिद्धेश पेडणेकर, डॉ. रघुनाथ धुरी आणि त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या शस्त्रक्रियेनंतर गाय सध्या स्थिर असून, तिची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.

प्लास्टिक कचऱ्याचे गंभीर परिणाम

गायी आणि इतर गुरे भटकंती करत असताना रस्त्यावर टाकलेला प्लास्टिकयुक्त कचरा चुकून खातात. या प्लास्टिकचा शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम होतो. त्यामुळे पचनसंस्था बंद पडण्याची शक्यता असते, जी अनेकदा मृत्यूलाही कारणीभूत ठरते.

जनावरांच्या आरोग्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा गायी, बैल, कुत्रे आदी जनावरे रस्त्यावर मोकाट फिरताना दिसतात. त्यांना भूक लागल्यावर ते रस्त्यावरील कचराकुंडीत सडलेले अन्न शोधत असतात. याच दरम्यान कचऱ्यामध्ये फेकलेले प्लास्टिकदेखील ते अन्नासोबतच गिळतात. त्यामुळे ते जनावरांच्या पचनसंस्थेत अडकते आणि हळूहळू त्याचा प्राण्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT