Goa: COVID-19 training for party workers begins in New Delhi Dainik Gomantak
गोवा

Goa: पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवी दिल्लीत COVID-19 चे प्रशिक्षण सुरु

गोव्यातुन(Goa) भाजपाच्या राज्य आरोग्य विभागाचे निमंत्रक डॉ. शेखर साळकर, सह निमंत्रक डॉ. स्नेहा भागवत व पक्षाचे समन्वयक शर्मद रायतुरकर यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: नवी दिल्लीत(New Delhi) भाजपच्या(BJP) मुख्य कार्यालयात पक्षाच्या राज्य स्तरावरील राष्ट्रीय आरोग्य निमंत्रकांसाठी कोरोनाच्या संभावीत तिसऱ्या लाटेला कसे तोंड द्यावे व काय उपाययोजना करावी या संदर्भात प्रशिक्षण सुरु आहे.गोव्यातुन(Goa) भाजपाच्या राज्य आरोग्य विभागाचे निमंत्रक डॉ. शेखर साळकर, सह निमंत्रक डॉ. स्नेहा भागवत व पक्षाचे समन्वयक शर्मद रायतुरकर यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

ही जगातील सर्वात मोठी मोहिम असुन या प्रशिक्षणांतुन 40 लाख स्वयंसेवक तयार केले जातील व देशातील 2 लाख गावांमधील नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

ऑक्सिजन लेव्हल कसे तपासावे, थर्मल स्क्रिनिंग तसेच आरोग्य विषयक इतर प्रशिक्षण देण्यात येत असुन स्वसंसेवी संस्था, सार्वजनिक आरोग्य केंद्र, निम सरकारी संस्था यांच्या प्रतिनिधिंना, कर्मचाऱ्यांना नंतर हे प्रशिक्षित स्वयंसेवक मार्गदर्शन करणार आहेत .

कोविड केअल केंद्र, इस्पितळांमध्ये सुद्धा कोविड केअर वार्ड तयार करण्यासाठी हे स्वयंसेवक सहकार्य करतील शिवाय लोकांना लस केंद्रावर नेण्याची सुद्धा जबाबदारी या स्वयंसेवकांवर असणार आहे.

भारतीय जनता पक्षाची ही मोहिम तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविणारी आहे. या मोहिमेचा आपण एक भाग असल्य़ाचा अभिमान वाटतो असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले आहे . भाजपाचे मुख्य कार्यालय सर्व सुविधा युक्त आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी एकाच छताखाली सर्व सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एका राजकीय पक्षाचे अशा प्रकारचे सर्व सुविधा युक्त मुख्य कार्यालय पाहुन आपण भारावलो असेही डॉ. साळकर यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heart Health: स्क्रिनच्या अतिवापरामुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका! वाचा काय आहे डिजिटल युगातील 'Heart Attack'

उद्धवस्त रनवे आणि जळालेल्या इमारती विजय वाटत असेल तर त्यांनी त्याचा आनंद घ्यावा; 3 मिनिटांत भारताने पाकच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला Watch Video

Goa University: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकाचोरीचे पुढे काय झाले?

Goa Politics: गोव्यात विरोधक एकत्र येऊ शकतील?

अग्रलेख : खराब रस्ते रोजगार पुरवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT