Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Uncle Murder Case: अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांनी हा निवाडा दिला. हे खून प्रकरण २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी सातच्या सुमारास घडले होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: घरगुती वादातून काकाच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या  दापट-लोलये येथील अजय खरात (वय २९ वर्षे) याला दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिवाय २५ हजार रुपये दंड व तो भरल्यास मृताच्या पत्नीला देण्याचा आदेशही  दिला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांनी हा निवाडा  दिला. हे खून प्रकरण २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी सातच्या सुमारास घडले होते. आरोपी अजय खरातचे वडील दारूच्या आहारी गेल्याने कुटुंबात वारंवार वाद होत असत. त्या दिवशी अजयचे काका जानू खरात (वय ४४ वर्षे) हे त्याच्या वडिलांना घरी घेऊन जाण्यासाठी आले होते.

त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात अजयने काकाच्या पोटात चाकू खुपसला. या गंभीर हल्ल्यात जानूचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काणकोण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासांत त्याला अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक चंद्रकांत  गावस यांनी केला. न्यायालयात सरकारी वकील उत्कर्ष आवडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी १७ साक्षीदारांच्या साक्षी आणि इतर पुरावे सादर करून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने  अजयला खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरविले.  जानूची पत्नी व मुलगा हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार  होते. त्यांची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. शवचिकित्सा अहवालात मृतदेहावर एकूण नऊ जखमा आढळल्या. त्या चाकूच्या हल्ल्यामुळे होऊ शकतात, अशी साक्ष शवचिकित्सक  डॉ. मधू घोडकिरेकर  यांनी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT