Gautam Khattar Bail Dainik Gomntak
गोवा

Gautam Khattar Bail: गौतम खट्टरला सशर्त जामीन, पण देशाबाहेर जाण्यास बंदी; सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप

St Francis Xavier Controversial Remarks: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या उजव्या विचारसरणीच्या ‘यूट्यूब इन्फ्लुएन्सर’ गौतम खट्टर याला जामीन मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या उजव्या विचारसरणीच्या ‘यूट्यूब इन्फ्लुएन्सर’ गौतम खट्टर याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. वास्को येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूजा देसाई यांनी हा आदेश दिला.

न्यायालयाने खट्टर याला १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर तसेच त्याच रकमेच्या एका हमीवर मुक्त करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर साक्षीपुराव्यात हस्तक्षेप करू नये, तपास अधिकाऱ्यांना निवासाचा पत्ता कळवावा, तपासात सहकार्य करावे आणि देशाबाहेर जाऊ नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली होती. तक्रारदाराच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करत ॲड. सिओला वाझ यांनी युक्तिवाद करताना, खट्टर याला जामीन दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वास्को पोलिस निरीक्षक वैभव नाईक, उपनिरीक्षक मयुरेश सावंत, दाबोळी विमानतळ पोलिस निरीक्षक जॉन फर्नांडीस यांच्यासह पोलिस कर्मचारी तैनात होते. खट्टर यांचे समर्थकही न्यायालयाबाहेर उपस्थित होते.

गौतमच्या वकिलाचा युक्तिवाद

खट्टर यांच्या वतीने ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी बाजू मांडली. संबंधित भाषणाचा व्हिडिओ पोलिसांकडे उपलब्ध असून, त्यातील आवाजाशी खट्टर यांचा आवाज जुळतो का, यासाठी नमुने घेण्यात आले आहेत. सर्व पुरावे पोलिसांकडे असताना त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याने जामीन द्यावा, असा युक्तिवाद त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT