Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

Goa Children Court Verdict: शंकर रेड्डी विरोधात ०१ जून २०१६ रोजी वाळपाई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सात वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
Goa Accident Case 2016
Goa Court JudgementDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पोटच्या मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप आणि चार लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बाल न्यायालयाच्या वतीने हा निवाडा देण्यात आला. होंडा – वाळपईत २०१६ मध्ये कौटुंबिक वादातून ही घटना घडली होती. यात दुसरी मुलगी देखील गंभीर जखमी झाली होती.

बाल न्यायालयाने दोषी पिता शंकर रेड्डी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच, चार लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यात खूनासाठी एक लाख, प्राणघातक हल्ला यासाठी दोन आणि पीडित मुलाला मदत म्हणून एक असा चार लाखांचा दंड ठोठावला आहे.

शंकर रेड्डी विरोधात ०१ जून २०१६ रोजी वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सात वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

Goa Accident Case 2016
आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

कौटुंबिक वादातून शंकरने मोठी मुलगी सुजाता हिच्यावर कोयत्याने वार केले होते. सुजाताला वाचविण्यासाठी लहान बहीण गौरी धावली तर तिच्यावर देखील शंकरने हल्ला केला होता.

यात सुजाताचा मृत्यू झाला होता तर गौरी गंभीर जखमी झाली होती. गौरीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आरोपी शंकर फरार झाला होता. पण, वाळपई पोलिसांनी लगेच त्याला अटक केली होती.

Goa Accident Case 2016
E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

मोठ्या मुलीचा खून आणि लहान मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शंकर दोषी आढळला आहे. घटनास्थळी आढळलेले रक्ताचे नमुने आणि गौरीची साक्ष यासाठी महत्वाचे पुरावे ठरले. बाल न्यायालयाने शंकरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Colva Police Arrest Serial Cheater
Goa Children’s Act 2003 violation
Ponda By Election 2026
Supreme Court Verdict on Bastard Word
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com