Goa Corona Update Dainik gomantak
गोवा

Goa Corona Update: गोवा कोरोनामुक्तीच्या दिशेने, कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट

गोव्यातील कोरोना संसर्गाची स्थिती काय? जाणून घ्या ताजी आकडेवारी

Pramod Yadav

Goa Corona Update: गोव्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. मागील काही दिवसांपासून गोव्यात नव्याने वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झाली असून, सक्रिय रूग्णसंख्या देखील घटली आहे. सोमवारी दिवसभरात गोव्यात केवळ तीन नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून, पाच कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला.

गोव्यात सध्याच्या घडीला राज्यात 40 कोरोनाबाधित रूग्णांवर (Active Corona Cases In Goa) उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 59 हजार 022 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 969 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 227 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.44 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेलं लसीकरण यामुळे कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात सध्या केवळ 40 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत. तसेच, दिवसेंदिवस वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT