Maharashtra: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार? चर्चांना उधाण

राज्यपालांची बदली होण्याची शक्यता
Bhagatsingh Koshyari
Bhagatsingh Koshyari Dainik Gomantak

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या अक्षेपार्ह विधानामुळे राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: पदमुक्त होण्याची इच्छा जवळच्या व्यक्तींकडे व्यक्त केली आहे. अशी माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

Bhagatsingh Koshyari
Pandharpur: फॉर्च्युनर 50 फूट खोल कालव्यात कोसळली; लावणी कलावंत मीना देशमुख यांचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनी देखील राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. संभाजी छत्रपती यांनी तर राज्यपाल हाटाओ असा नारा देत राज्यसरकारला देखील धारेवर धरले आहे.

Bhagatsingh Koshyari
Delhi: पुन्हा तुकडे, फ्रीज अन् दिल्ली! मुलाच्या मदतीने महिलेने केले पतीच्या शरीराचे 22 तुकडे, पाहा Video

महापुरूषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे - खासदार उदयनराजे भोसले

महापुरूषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात घेतलेल्या शिवप्रेमी संघटनेच्या बैठकीत मांडले. राजकीय स्वार्थासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केली जात आहेत. परंतु, वाईट याचं वाटतं की, त्यांच्याबाबत गलिच्छ कोणी बोलले तर त्यांच्यावर कारवाई होत नाही. असे उदयनराजे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com